मलकापूरचे नगरसेवक पवार अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:46 AM2019-07-15T00:46:39+5:302019-07-15T00:46:44+5:30

मलकापूर : टेम्पो आणि कारची धडक होऊन मलकापूरचे नगरसेवक दत्ता सीताराम पवार (वय ४३) यांचा मृत्यू झाला, तर अन्य ...

Malkapur corporator killed in Pawar crash | मलकापूरचे नगरसेवक पवार अपघातात ठार

मलकापूरचे नगरसेवक पवार अपघातात ठार

googlenewsNext

मलकापूर : टेम्पो आणि कारची धडक होऊन मलकापूरचे नगरसेवक दत्ता सीताराम पवार (वय ४३) यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरनजीक खंडोबानगर येथे शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
समाधान चव्हाण व केदार होगले अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे असून, त्यांच्यावर कºहाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूरचे नगरसेवक दत्ता पवार यांच्यासह त्यांचे मित्र समाधान चव्हाण व केदार होगले हे शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कारमधून (एमएच ११ एके ५६९०) पाचवड फाट्याकडून कºहाड बाजूकडे येत होते. मलकापूर हद्दीत खंडोबानगरजवळ महामार्गावर टेम्पो (एमएच १२ एचडी ५६२६) हा टायर पंक्चर झाल्याने उभा होता. दरम्यान, पाठीमागून आलेल्या कारची टेम्पोला धडक बसल्याने कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले.
अपघात निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कृष्णा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून दत्ता पवार यांना कोल्हापूरला हलवण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कºहाड शहर पोलिसांत झाली आहे.

Web Title: Malkapur corporator killed in Pawar crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.