सलग ५५ वर्षे ‘मेंबर’ असलेल्या माधवराव निगडेंची अखेर दखल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:10 AM2018-02-03T00:10:00+5:302018-02-03T00:10:12+5:30

Madhavrao Gadhade, who is a 55-year-old member, is finally interrupted. | सलग ५५ वर्षे ‘मेंबर’ असलेल्या माधवराव निगडेंची अखेर दखल..

सलग ५५ वर्षे ‘मेंबर’ असलेल्या माधवराव निगडेंची अखेर दखल..

Next



स्वप्नील शिंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटले राजकारणातील रथी-महारथींना घाम फुटत असतो. मात्र, वाई तालुक्यातील आसले गावचे ८१ वर्षांचे माधवराव निगडे यास अपवाद आहे. गावातील भावकी आणि गट-तटातून त्यांनी ग्रामपंचायतीत सलग बारावेळा निवडून येऊन ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारकिर्द करत आहे. अशाप्रकारे पंचायतराज व्यवस्थेत राष्ट्रीय विक्रम केल्याने त्याची लिम्का बुकला दखल घ्यावी लागली आहे.
सातारा जिल्ह्याचे सुपूत्र असलेले खासदार शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दीची तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनीही स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार आणि विधिमंडळ अशी राजकीय कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण केली. दुसरीकडे आसले ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत सलग ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आहे.
ग्रामपंचायत सदस्य होण्यापूर्वी त्यांनी जिल्हा सहकारी बोर्डात जिल्हास्तरावर सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर वयाच्या २६ व्या वर्षी ते पहिल्यांदा १९६२ मध्ये आसले ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य झाले. ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर गावचे पहिले सरपंच म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी सलग दहा वर्षे सरपंच व नंतर आरक्षणामुळे दोन पंचवार्षिक कार्यकाळात उपसरपंच म्हणून काम केले आहे.
त्यांच्या कारकिर्दीत गावातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, कृषी क्षेत्रात अनेक विकासकामे केली. गावाला वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते निवडून आले असून, सध्या ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असून, त्यांची मुदत २०२० पर्यंत आहे. वयाच्या ८१ व्या वर्षीही त्यांचा
उत्साह आणि काम करण्याची
तयारी पाहून आजही गावच्या तरुणांना त्यांचा हेवा वाटत असतो. त्यांच्या या कामाची लिम्का बुकने २०१२ मध्ये देशातील ग्रामपंचायतींमध्ये सर्वात मोठी आणि सलग कारकिर्द केल्याची नोंद घेतली आहे. सध्या महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून त्यांच्या कामाची दखल घ्यावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
शासन दप्तरी नोंदीअभावी वंचित
अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणाºया माधवराव निगडेंच्या विक्रमाची शासनपातळीवर कुठेही नोंद नाही. काही वर्षांपूर्वी पंचायत राज संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय अधिवेशन भरले होते. त्यावेळी ज्यांनी २५ वर्षे किंवा जास्त वर्षे कारकिर्द पूर्ण केलेल्या लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सातारा जिल्हा प्रशासनास जिल्ह्यात असा कोण व्यक्ती आहे, हेच माहिती नव्हते.
सहकारी चळवळीतही योगदान
ग्रामपंचातीत काम करत असताना वाई तालुक्यातील सहकारी संस्था उभारण्यात योगदान दिले आहे. किसन वीर सहकारी साखर कारखाना, वाई तालुका सूतगिरणी स्थापनेपासून शेअर गोळा करण्यापासून उभारणीपर्यंत सभासद म्हणून काम करत आहेत.

Web Title: Madhavrao Gadhade, who is a 55-year-old member, is finally interrupted.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.