आषाढीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या जीपला अपघात, सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 04:43 PM2019-07-11T16:43:16+5:302019-07-11T16:44:33+5:30

आषाढीनिमित्ताने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेली जीप गुरुवारी सकाळी म्हसवड-मायणी रस्त्यावरील कुकुडवाड घाटाच्या उताराला घरावर जाऊन आदळली. यामध्ये सातजण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर वडूजमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या ठिकाणी बुधवारी रात्रीही ट्रॅक्टर घरावर आदळला होता.

Jeep accident, seven wounded in Pandharpur road accident | आषाढीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या जीपला अपघात, सात जखमी

आषाढीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या जीपला अपघात, सात जखमी

Next
ठळक मुद्देआषाढीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या जीपला अपघात, सात जखमीकुकुडवाड घाटाच्या उताराला घरावर आदळली गाडी

म्हसवड/कुकुडवाड : आषाढीनिमित्ताने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेली जीप गुरुवारी सकाळी म्हसवड-मायणी रस्त्यावरील कुकुडवाड घाटाच्या उताराला घरावर जाऊन आदळली. यामध्ये सातजण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर वडूजमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या ठिकाणी बुधवारी रात्रीही ट्रॅक्टर घरावर आदळला होता.

या अपघातात रमेश लक्ष्मण कळंत्रे (वय ४२) यांचे डोके, सुगंधा रघुनाथ मोरे (४२) यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. रमेश विष्णू मोरे (४२), अरुण लक्ष्मण मोरे (४०), सीता बाबासो मोरे (४०), सर्जेराव तातोबा चोरगे (५०), संतोष कृष्णा मोरे (२५, सर्व रा. शेंडेवाडी, कुंभारगाव, ता. पाटण) हे किरकोळ जखमी झाले. त्यांना मायणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. डॉ. गणेश मदने यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वडूज येथे पाठवले आहे.

म्हसवड-मायणी रस्त्यावरील कुकुडवाड खिंडीतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, संरक्षण कठड्याची पडझड, तर साईडपट्ट्या खचल्याने वारंवार अपघात होत आहेत. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

मायणीवरून म्हसवडकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर बुधवारी रात्री कुकुडवाड घाटातून येत असताना ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने उसाने भरलेल्या दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर सुवर्णा बाळासाहेब जाधव यांच्या घरावर आदळला.

या अपघाताच्या ठिकाणापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर दुसºयाच दिवशी गुरुवारी सकाळी कुंभारगाववरून पंढरपूरला निघालेली जीप कुकुडवाड खिंडीत येताच भुजंग महादेव जाधव यांच्या घरावर जाऊन आदळली. यामध्ये घराच्या भिंतीचे नुकसान झाले. जीपमधील चारजण जखमी झाले. जखमींना मायणी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

कुकुडवाड घाटातील रस्ता बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्त करून संरक्षण कठडे, साईडपट्ट्या, खड्डे तातडीने दुरुस्ती करावेत, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी आंदोलन करणार आहे, असा इशारा कुकुडवाड माजी सरपंच संजय जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिला.

Web Title: Jeep accident, seven wounded in Pandharpur road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.