गॅस सिलिंडर एक.. किंमत मात्र वेगवेगळी वसूल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:07 PM2018-10-05T23:07:20+5:302018-10-05T23:07:27+5:30

Gas cylinders a .. Price recovered separately .. | गॅस सिलिंडर एक.. किंमत मात्र वेगवेगळी वसूल..

गॅस सिलिंडर एक.. किंमत मात्र वेगवेगळी वसूल..

Next

सातारा : अगोदरच आर्थिक मंदीत सापडलेल्या व्यावसायिकांना आणखीनच आर्थिक विवंचनेत ढकलण्यासारखे प्रकार सध्या सातारा शहरात घडत आहेत. एका कमर्शियल गॅस सिलिंडरची वेगवेगळी किंमत वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. मात्र, यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने नेमकी तक्रार करायची कुठे? असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.
सातारा शहरामध्ये आता पूर्वीसारखे व्यवसाय चालत नसल्याची तक्रार अनेक व्यावसायिक करत असतात. त्याची कारणेही बरीच असतात. काही वैयक्तिक तर काही कारणे ही प्रशासकीय पातळीवरील असतात. त्यामुळे व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
सध्या साताऱ्यातील विशेषत: हॉटेल व्यावसायिकांना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर वारंवार बदलत असतात. त्यामुळे काही वेळेला व्यावसायिकांना दर निश्चित समजत नाहीत. परंतु सिलिंडर एकच असताना एकाच सिलिंडरची वेगवेगळी किंमत कशी असू शकते, असा प्रश्न व्यावसायिकांना पडत आहे.
काही दिवसांपूर्वी कमर्शियल एका गॅसची किंमत १३०० रुपये होती. परंतु हाच गॅस अन्य कर्मचारी १३८० रुपये किमतीने विकत होते. ही तफावत समोर आल्यानंतर काही व्यावसायिकांनी संबंधित एजन्सीच्या कर्मचाºयांना गॅसचे वजन करून देण्याची मागणी केली. परंतु त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
वजन काटा उपलब्ध नाही. त्याचे पावती पुस्तक आमच्याजवळ नाही, अशी उत्तरे ते देऊ लागले. त्यामुळे काही व्यावसायिकांना त्यांची शंका आली. त्यांनी गॅस उचलून पाहिला असता अगदी हलका लागला. त्यामुळे त्यांच्याकडून खरेदी केलेल्या टाकीमध्ये गॅस कमी असल्याचा व्यावसायिकांकडून आरोप होत आहे. इतरवेळी हॉटेलमधील सिलिंडर १० ते १५ दिवस पुरतो. परंतु हा सिलिंडर पाच ते आठ दिवस व्यावसायिकांना पुरतो. त्यामुळे गॅसची किंमत कमी असल्यामुळे काही व्यावसायिक गॅस एजन्सीच्या कर्मचाºयांच्या आमिषाला बळी पडतात. अनेक व्यावसायिक कमी किमतीतला गॅस विकत घेतात. काही दिवसांतच आपण फसलो गेलो असल्याचे मग लक्षात येते. परंतु एकाच सिलिंडरला वेगवेगळ्या दोन किमती कशा? असा प्रश्न व्यावसायिकांमधून उपस्थित होत आहे. याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही होत आहे.
शहरातून सिलिंडर घेऊन फिरणारे.. हिंदी भाषिक..
एकाच एजन्सीचे आणि एका सिलिंडरचे दर वेगवेगळे असल्याने व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. एका सिलिंडर गाडीतून रितसर पावती आणि गॅसची किंमत घेतली जाते. परंतु दुसºया वाहनातून फिरणाºया हिंदी भाषिक कर्मचाºयांकडून गॅसची किंमत कमी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अनेक व्यावसायिक त्यांच्याकडूनच गॅस विकत घेतात. परंतु त्या वजन कमी असल्याचा आरोप होत आहे.

Web Title: Gas cylinders a .. Price recovered separately ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.