Front of farmers affected by National Highway, Mhaswad Talathi office; Revenue administration request | राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाºया शेतकºयांचा मोर्चा , म्हसवड तलाठी कार्यालय; महसूल प्रशासनाला निवेदन

ठळक मुद्देशेकडो शेतकºयांचा सहभागशेतकºयांच्या जमिनीवर व संबंधित रस्त्यावर येऊनच करण्यात याव्यात

म्हसवड : सातारा-म्हसवड-टेंभुर्णी महामार्ग क्रमांक ५४८ सी या राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाºया शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी मासाळवाडी परिसरातील शेकडो शेतकºयांनी येथील तलाठी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन महसूल प्रशासनाला दिले. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत रस्त्याचे काम होऊ देणार नसल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.

भूसंपादन कायद्याच्या विसंगतपणे शेतकºयांवर अन्याय करणाºया प्रशासनाच्या विरोधात सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग शेतकरी संघर्ष समिती म्हसवडच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चा सातारा-पंढरपूर रस्त्यावरून बसस्थानक चौक, महात्मा फुले चौक ते तलाठी कार्यालयावर काढून आंदोलनकर्त्यांनी महसूल प्रशासनाला निवेदन दिले. यानिवेदनात विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये जुना म्हसवड-टेंभुर्णी रस्ता ज्या लांबी रुंदीचा आहे व ज्या पद्धतीने जुन्या नकाशात आहे त्याच पद्धतीने करण्यात यावा. जे नवीन महामार्गालगत सर्व्हे क्रमांकाची येत आहेत त्या संपूर्ण सर्व्हे क्रमांकाची मोजणी करून महामार्गासाठी लागणारे क्षेत्र शेतकºयांच्या समक्ष अधिग्रहण करण्यात यावे. जेवढे क्षेत्र अधिग्रहण झाले आहे त्या संपूर्ण क्षेत्राचा आर्थिक मोबदला संपादित शेतकºयांला रस्त्याचे काम होण्यापूर्वी मिळावा.

ज्या क्षेत्रामध्ये बागायत, विहिरी, झाडेझुडपे इतर माहिती खातरजमा करून आर्थिक मोबदला देण्यात यावा. इथून पुढे आम्ही शेतकरी विनाकारण शासन दरबारी हेलपाटे मारणार नाही. ज्या कारवाया करायच्यात त्या शेतकºयांच्या जमिनीवर व संबंधित रस्त्यावर येऊनच करण्यात याव्यात. या मागण्या मान्य झाल्याशिवाय महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येऊ नये.

या मोर्चात डॉ. प्रमोद गावडे, डॉ. वसंत मासाळ, बबनशेठ विरकर, अप्पासाहेब पुकळे, नगराध्यक्ष तुषार विरकर, नितीन दोशी, अखिल काझी, बाळासाहेब काळे, बाळासाहेब मासाळ, लुनेश विरकर, भगवानराव पिसे, अजिनाथ केवटे यांच्यासह शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी निषेध करून यापुढे प्रशासनाने शेतकºयांना मोबदला न देता महामार्गाचे काम सुरू ठेवल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.


Web Title:  Front of farmers affected by National Highway, Mhaswad Talathi office; Revenue administration request
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.