परदेशी पाहुणे म्हणे.. ‘कास इज वंडरफुल!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:19 PM2017-09-10T23:19:21+5:302017-09-10T23:19:24+5:30

Foreign visitors say 'Kas is Wonderful!' | परदेशी पाहुणे म्हणे.. ‘कास इज वंडरफुल!’

परदेशी पाहुणे म्हणे.. ‘कास इज वंडरफुल!’

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या व जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. दुर्मीळ अन् विविधरंगी फुले पर्यटकांना आकर्षिक करीत असून, शनिवारी भारतासह रशिया व जर्मनी येथील विदेशी पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. तसेच फुले पाहून ‘कास इज वंडरफुल’ असा अभिप्रायही नोंदविला.
सातारा शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असणाºया कास पठाराने आपल्या दुर्मीळ व विविधरंगी फुलांची ख्याती सातासमुद्रापार पोहोचविली आहे. देशभरातील पर्यटकांबरोबरच परदेशी पाहुण्यांच्या हृदयात देखील येथील फुलांनी आपले स्थान पक्के केले आहे. फुलांचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक कास पठारावर दाखल होऊ लागले आहेत. चालू हंगामात आतापर्यंत स्वीझर्लंड, रशिया या देशातील पर्यटकांनी पुष्प पठाराचा नजराणा अनुभवला असून, पठाराचे सौंदर्य आपल्या कॅमेºयात बंदिस्त केले आहे. एवढेच नव्हे परतीच्या प्रवासाला निघताना विदेशी पर्यटकांनी आपल्या भाषेत फुले खूप सुंदर असल्याचा अभिप्रायही नोंदविला आहे.
सध्या पठारावर गेंद, सीतेची आसवे ही फुले मोठ्या प्रमाणावर बहरली असल्याने बहुतांशी ठिकाणी पांढºया व जांभळ्या फुलांचे गालिचे दिसू लागले आहेत. फुले उमलण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने काही दिवसांत पठारावर फुलांचे गालिचे पाहावयास मिळणार आहे. अबोलिमा, सोनकी, आभाळी, नभाळी, ड्रॉसेरा, कंदील पुष्प आदी प्रकारच्या फुलांना बहर आला असून, हजारो पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत.
गतवर्षी फुले पाहण्यासाठी रशिया, जपान, अमेरिका, इग्लंड, जर्मनी आदी देशांतील पर्यटकांनी कासला भेट दिली होती.
यवतेश्वर घाटात वाहनांच्या रांगा
साताºयाहून कासला जाण्यासाठी यवतेश्वर घाटातूनच जावे लागते. शनिवार व रविवार सलग सुट्या असल्यामुळे राज्यभरातील हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. मात्र, वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मनस्तापही सहन करावा लागला. कासकडे जाताना व कासहून पुन्हा साताºयाकडे येताना यवतेश्वर घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तब्बल चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे मंदावली. चार किलोमीटर लांबीचा घाट उतरण्यासाठी पर्यटकांना अर्धा ते पाऊण तास इतका वेळ लागला.

Web Title: Foreign visitors say 'Kas is Wonderful!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.