अटकेसाठी आलेल्या पोलिसाचा दत्ता जाधवने दाबला गळा! प्रतापसिंह नगर : पाचजणांवर गुन्हा; पोलिसांकडून तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:11 AM2018-05-06T00:11:06+5:302018-05-06T00:11:06+5:30

सातारा : मोक्कांतर्गत दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी आलेल्या पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा गुंड दत्ता जाधवने गळा दाबल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री प्रतापसिंहनगरात ही घटना घडली होती.

Datta Jadhav, the police officer who was arrested for the attack! Pratapsingh Nagar: Five offenses; Police are investigating | अटकेसाठी आलेल्या पोलिसाचा दत्ता जाधवने दाबला गळा! प्रतापसिंह नगर : पाचजणांवर गुन्हा; पोलिसांकडून तपास सुरू

अटकेसाठी आलेल्या पोलिसाचा दत्ता जाधवने दाबला गळा! प्रतापसिंह नगर : पाचजणांवर गुन्हा; पोलिसांकडून तपास सुरू

googlenewsNext

सातारा : मोक्कांतर्गत दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी आलेल्या पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा गुंड दत्ता जाधवने गळा दाबल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री प्रतापसिंहनगरात ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दत्ता जाधवसह पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

गुंड दत्ता जाधवला पकडण्यासाठी शुक्रवारी रात्री पोलीस प्रतापसिंहनगर येथे गेले होते. दोनशेहून अधिक पोलिसांचा ताफा प्रतापसिंहनगरात तैनात करण्यात आला होता. तसेच साध्या वेशातील पोलीसही त्या परिसरात फिरत होते. प्रतापसिंहनगरात पोलीस आल्याचे समजताच गुंड दत्ता जाधव हा घरातून बाहेर पडला. शेजारील एका घरात बाहेरहून कुलूप लावून आतमध्ये फॅनची हवा खात बसला होता. परंतु आतील लाईट चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे दत्ता जाधव याच घरात असावा, अशी शंका पोलिसांना आली. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी दत्ता जाधवने पोलिसांना विरोध केला. पोलिसांनी दत्ता जाधवला पकडल्याचे समजल्यानंतर त्याठिकाणी लक्ष्मी जाधव, गंगूबाई, रमेश खुडे, झुंबर यांच्यासह अन्य काहीजण तेथे आले. जाधवसह इतरांनी पोलीस पथकातील स्वामी यांचा गळा दाबला तसेच त्यांना खाली पाडून मारहाण करणे सुरू केले. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी बळाचा वापर करत हल्ला करणाºयांना त्याठिकाणाहून पिटाळून लावले.तक्रार पोलीस कर्मचारी राहुल खाडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली असून, दत्ता जाधवसह पाचजणांवर गुन्हा दाखल आला.

दोघांत मिळून टेंडर..
इकबाल हुसेन व दत्ता जाधव यांनी एकत्र येऊन किसन वीर कारखान्यातील भंगार मालाचे टेंडर २५ जानेवारी २०१८ ला भरले होते. दरम्यान, टेंडरची मूळ रक्कम व जीएसटीसह अंदाजे १ कोटी ६१ लाख रुपये कारखान्याच्या खात्यामध्ये भरले. त्यानंतर भंगार माल ट्रकद्वारे कारखान्याबाहेर काढत असताना वेळोवेळी दत्ता जाधव व त्याच्या साथीदारांनी इकबाल हुसेन व कामगारांना धमकावून लाखो रुपये खंडणीस्वरुपात घेतले.

दत्ता जाधवने उकळली ३८ लाखांची खंडणी
पाचवड : गुंड दत्ता जाधव व त्याच्या टोळीला खंडणीच्या गुन्ह्यात मोक्कांतर्गत कारवाई करून जेरबंद केल्यानंतर शनिवारी भुर्इंज पोलीस ठाण्यात याच टोळीविरोधात किसन वीर कारखान्यातील भंगार मालाचे टेंडर मिळविण्यासाठी ३८ लाख रुपयांची खंडणी वसुली केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इकबाल सय्यदतालीब हुसेन( सध्या रा. भुर्इंज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. किसन वीर सहकारी साखर कारखान्यातील भंगार मालाचे टेंडर भरू नका, अशी दमबाजी करीत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून, ट्रक पेटवून देण्याची धमकी देऊन तसेच जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने पुणे येथे नेऊन वेळोवेळी मागणी करून ३८ लाख रुपये रुपयांची खंडणी दत्ता जाधवने उकळल्याचे समोर आले आहे. दत्ता जाधवचा मित्र पैलवान, शुकराज पांडुरंग घाडगे, शामराव तिवारी, कुमार खत्री व अन्य अनोळखी चारजण यांनी हे पैसे घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Datta Jadhav, the police officer who was arrested for the attack! Pratapsingh Nagar: Five offenses; Police are investigating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.