साताऱ्यातून काँग्रेस वज्रमूठ आवळणार-सर्वजण येणार एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:47 PM2019-02-04T22:47:20+5:302019-02-04T22:48:02+5:30

जिल्ह्यातील काँग्रेसला बळ देण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याच्या वाटेवर असून, त्याचा प्रारंभ मंगळवारी साताºयात नूतन जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाºयांच्या सत्कार समारंभाने होणार आहे. त्यामुळे पक्ष पुन्हा वज्रमूठ आवळून जिल्ह्यात घोडदौड करण्यासाठी सज्ज होणार

Congress from Satara will be able to indulge in fright - all who come together | साताऱ्यातून काँग्रेस वज्रमूठ आवळणार-सर्वजण येणार एकत्र

साताऱ्यातून काँग्रेस वज्रमूठ आवळणार-सर्वजण येणार एकत्र

googlenewsNext
ठळक मुद्देपदाधिकाºयांचा सत्कार सोहळा, लवकरच राहुल गांधी दौºयावर

सातारा : जिल्ह्यातील काँग्रेसला बळ देण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याच्या वाटेवर असून, त्याचा प्रारंभ मंगळवारी साताºयात नूतन जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाºयांच्या सत्कार समारंभाने होणार आहे. त्यामुळे पक्ष पुन्हा वज्रमूठ आवळून जिल्ह्यात घोडदौड करण्यासाठी सज्ज होणार आहे. तर येत्या काही दिवसांत काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना साताºयात आणून पक्षाला नवचैतन्य मिळवून देण्याचा प्रयत्न होणार आहे.

फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. या निवडीने जिल्ह्यात पक्षाला तरुण चेहरा मिळाला आहे. या निवडीनंतर प्रथमच अनेक दिवसांनी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, अ‍ॅड. विजयराव कणसे काँग्रेस कमिटीत एकत्र आले. त्यावेळी सर्वांनीच मनोगत व्यक्त करताना पक्षाचे नुकसान कसे झाले, याचे विवेचन करून अंतर्गत वाद सोडून पुन्हा एकत्र येण्याचा निर्धार केला.
त्यानंतर कºहाड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेची निवडणूकही काँग्रेसने जिंकली. त्यामुळे पक्षात नवचैतन्य पसरू लागले. यानिमित्ताने काँग्रेस कमिटीतील कार्यक्रमातच ५ फेब्रुवारीला साताºयात नूतन जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाºयांच्या सत्काराचे आयोजन करण्याचे ठरले. त्यानंतर गेला आठवडाभर जिल्हाभर याचे नियोजन सुरू झाले.

नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे यांनी कोणतीही कसूर न ठेवता तालुकावार पक्षाचे मेळावे घेतले.
या मेळाव्याच्या माध्यमातून पक्ष बळकटीसाठी तरुणांनाही प्रोत्साहित केले. तसेच पक्षासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहनही केले होते. या मेळाव्यामुळे जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर पक्षाचे वारे वाहू लागल्याचे दिसून आले. त्यातच आनंदराव पाटील, जयकुमार गोरे हेही अनेकवेळा एकत्र दिसल्याने अंतर्गत वादाला सध्यातरी मूठमाती दिल्याचे दिसून आले.

साताºयात मंगळवारी सत्कार सोहळा होत आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार मोहनराव कदम यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. एकंदरीतच हा कार्यक्रम अंतर्गत वाद सोडून होत असल्याने पक्षासाठी हे शुभसंकेतच आहेत.

राहुल गांधींच्या सभेने पिक्चर दाखवू...
साताºयात मंगळवारी काँग्रेसचा कार्यक्रम होत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातून हजारोजण येतील; पण पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही सातारा येथे आणण्याचे नियोजन केले आहे. काही दिवसांत त्यांच्या दौºयाची तारीख निश्चित होईल. त्यामुळे मंगळवारी ट्रेलर दाखविणार असलो तरी राहुल गांधी यांच्या सभेमुळे पिक्चर दाखवून देऊ, असे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.


काका पक्षाची ताकद...
माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे काँग्रेस पक्षाची ताकद आहेत. त्यांनाही साताऱ्यातील कार्यक्रमासाठी आणण्याचे प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांनाही बोलविले असून, त्यांनी येण्याचे कबूल केले आहे, असेही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: Congress from Satara will be able to indulge in fright - all who come together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.