सातारा-लोणंद मार्गावरील वाहतुकीत बदल, नवा मार्ग.. जाणून घ्या

By सचिन काकडे | Published: October 10, 2023 04:26 PM2023-10-10T16:26:12+5:302023-10-10T16:26:33+5:30

रेल्वे लाईन टाकण्याचे काम

Change in traffic on Satara Lonand route | सातारा-लोणंद मार्गावरील वाहतुकीत बदल, नवा मार्ग.. जाणून घ्या

सातारा-लोणंद मार्गावरील वाहतुकीत बदल, नवा मार्ग.. जाणून घ्या

सातारा : सातारा ते लोणंद या राज्यमार्गावर काळीमोरी रेल्वे पुलाजवळ मध्ये रेल्वे विभाग, पुणे यांच्याकडून नवीन रेल्वे पुल बांधण्यात येत आहे. येथील सध्याचा वाहतुकीचा पुल काढून टाकण्यात येणार असून, दुसरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी दि. १३ ऑक्टोबरपर्यंत सातारा लोणंद मार्गावरील अंतर्गत वाहतुकीत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी बदल केला आहे.

पुणे-लोणंद मार्गे साताराकडे तसेच फलटण वरुन साताराकडे येणारी अवजड वाहतूक लोणंद वरुन खंडाळा, शिरवळ मार्गे पुणे बंगळुरू महामार्गावरून साताऱ्याकडे जाईल. साताऱ्याकडून वाढे फाटा ते लोणंदकडे जाणारी अवजड  वाहतूक वाढे फाट्यावरुन न वळवता सरळ पुणे-बंगळूर  महामार्गाने शिरवळ मार्गे लोणंदकडे जाईल. फलटणवरुन साताराकडे येणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने फौजी ढाबा येथून तडवळे संमत वाघोलीमार्गे पिंपोडे बुद्रुक ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन मार्गे साताराकडे जातील. 

लोणंद-सालपे मार्गे येणारी हलकी व दुचाकी वाहने तडवळे संमत वाघोलीमार्गे पिंपाडे बुद्रुक ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन मार्गे सातारा, कोरेगावकडे जातील. सातारा, कोरेगावकडून लोणंद व फलटण बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने वाग्देव चौक वाठार स्टेशन मार्गे पिंपोडे बुद्रुक ते तडवळे संमत वाघोली ते लाणंद, फौजी ढाबामार्गे फलटणकडे जातील. आदर्की फाटा येथील फौजी ढाबा ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन हा रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

Web Title: Change in traffic on Satara Lonand route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.