अट्टल गुन्हेगार सचिन चव्हाणला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:29 PM2018-09-09T23:29:25+5:302018-09-09T23:29:28+5:30

The arrest of Indental Criminalist Sachin Chavan | अट्टल गुन्हेगार सचिन चव्हाणला अटक

अट्टल गुन्हेगार सचिन चव्हाणला अटक

googlenewsNext

फलटण : फलटण, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये फरारी असलेला सचिन चव्हाण या अट्टल गुन्हेगारास रविवारी दुपारी बाराच्या सुमारास फलटण ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून झिरपवाडीच्या हद्दीमध्ये पकडले. या कारवाईत सचिन चव्हाणने दोन कर्मचाऱ्यांवर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते दोघे जखमी झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, सचिन हनुमंत चव्हाण (वय ३३, रा. कुरवली खुर्द, ता. फलटण), सचिन भिसे व सचिन मदने या त्रिकुटाने गेल्या काही वर्षांमध्ये वाटमारी, दरोडे, खुनाचा प्रयत्न अशा गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांमध्ये उच्छाद मांडला होता. फलटण, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये या त्रिकुटांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी सचिन भिसे याचा काही वर्षांपूर्वी फलटणमध्ये खून झाला होता. तर सचिन मदने बेपत्ता आहे. दोन साथीदारांच्या ताटातुटीमुळे सचिन चव्हाण एकटा पडला होता. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने स्वत:ची टोळी तयार केली होती.
सचिन चव्हाण याने काही महिन्यांपूर्वी उपळवे येथील पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तत्कालीन परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या हातावर तुरी देऊन तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे सातारा स्थानिक गुन्हे शाखा, फलटण ग्रामीण व शहर पोलीस ठाणे त्याचा शोध घेत होते.
दरम्यान, सचिन चव्हाण हा रविवारी सकाळी कुरवली खुर्द या त्याच्या घरी येणार असल्याची माहिती फलटण ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने त्याला पकडण्यासाठी परिसरात सापळा रचला.
तो फलटण तालुक्यातील विंचुर्णी येथे दुचाकीवरून जात असताना गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने त्याचा पाठलाग केला. त्यावेळी त्याने दुचाकी गिरवीच्या दिशेने दामटली. यानंतर पोलीस कर्मचाºयांनीही सिनेस्टाईल त्याचा थरारक पाठलाग केला असता गिरवी-फलटण रस्त्यावर असणाºया एका ढाब्यासमोर त्याला पकडले.
यावेळी सचिन चव्हाणने पथकातील तुपे व जगदाळे यांच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. अशा अवस्थेतही तुपे व जगदाळे यांनी चव्हाणला पकडून ठेवले. यामध्ये तुपे व जगदाळे जखमी झाले. दरम्यान, सचिन चव्हाण याला अटक करण्यात आली. त्यामुळे फलटण पोलिसांनी मात्र सुटकेचा नि:श्वास सोडलेला आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांकडून मोक्कान्वये कारवाई
काही वर्षांपूर्वी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध गंभीर गुन्ह्णांच्या सहभागामुळे सचिन चव्हाणवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्कान्वये कारवाई केली होती. त्यामुळे सचिन चव्हाण बरीच वर्षे कारागृहात होता. मात्र, कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा एकदा गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. राजकीय पाठबळामुळे सचिनवरील गुन्हे खपवून गेले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी पेट्रोल पंप लुटीच्या प्रकरणाने तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता.
अनेक गुन्ह्यांची उकल होणार
फरार असतानाही सचिन चव्हाण याचा अनेक गुन्ह्णांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत. सचिनच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्णांची उकल होण्यास पोलिसांना मदत होणार आहे. तसेच सचिन चव्हाणला पकडणाºया फलटण ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकातील कर्मचाºयांना रिवार्ड मिळावे, यासाठी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हंकारे यांनी दिली आहे.

Web Title: The arrest of Indental Criminalist Sachin Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.