पुणे-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात; पाचजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 03:40 PM2018-04-27T15:40:33+5:302018-04-27T15:42:32+5:30

अपघातात चारजण गंभीर जखमी

accidents on Pune Pandharpur road Five dead four injured | पुणे-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात; पाचजणांचा मृत्यू

पुणे-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात; पाचजणांचा मृत्यू

Next

फलटण : पुणे पंढरपूर मार्गावर बरड येथे झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन मुलांसह पाचजण जागीच ठार झाले आहेत. तर चारजण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. 

सोलापूरहून पुण्याच्या दिशेनं निघालेल्या कारला (एमएच १४ बीसी-९४८०) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. बरड गावच्या हद्दीत असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्यालगतच्या झाडावर धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीचं इंजिन ड्रायव्हर सीटपर्यंत आलं. या गाडीत एकूण नऊजण प्रवास करत होते. त्यापैकी पाच प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला, तर चारजणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. जखमींवर फलटण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाचजणांची बसण्याची क्षमता असलेल्या या गाडीतून सुमारे नऊजण प्रवास करत होते. या अपघाताचा अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड करत आहेत.

Web Title: accidents on Pune Pandharpur road Five dead four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.