४५ हजार पर्यटक ‘आॅनलाईन’ने पठारावर : कास पठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 08:33 PM2018-11-17T20:33:34+5:302018-11-17T20:33:48+5:30

सातारा : जैवविविधतेचा समृद्ध वारसा लाभलेल्या कास पठारावर यंदाच्या मौसमात सुमारे एक लाख दहा हजार पर्यटकांनी भेट दिली. यापैकी ...

 45 thousand tourists 'online' plateau: Kass plateau | ४५ हजार पर्यटक ‘आॅनलाईन’ने पठारावर : कास पठार

४५ हजार पर्यटक ‘आॅनलाईन’ने पठारावर : कास पठार

Next
ठळक मुद्देनियंत्रित पर्यटनामुळे फिरण्याचा मनसोक्त आनंद

सातारा : जैवविविधतेचा समृद्ध वारसा लाभलेल्या कास पठारावर यंदाच्या मौसमात सुमारे एक लाख दहा हजार पर्यटकांनी भेट दिली. यापैकी सुमारे ४५ हजार पर्यटकांनी ‘आॅनलाईन बुकिंग’ सुविधेचा लाभ घेतला. नियंत्रित पर्यटनामुळे यावर्षी वाहतूक कोंडीचा एकही प्रकार कास रस्त्याला घडला नाही. पर्यटकांचे लोंढे ते नियंत्रित पर्यटन असा कासचा प्रवास निश्चितच आशादायक चित्र दर्शविणारा आहे.

आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीतील सुमारे ५० दिवस कास पठारावर फुलांचा हंगाम चालतो. युनेस्कोने जागतिक निसर्ग वारसास्थळाचा दर्जा पठाराला दिल्याने केवळ राज्यातील, देशातील नव्हे तर जगभरातील पर्यटकांचे पाय या हंगामात कास पठाराकडे वळतात. उपलब्ध आकडेवारीनुसार २०१६ मध्ये एक लाख ४० हजार, २०१७ मध्ये एक लाख आणि यंदाच्या हंगामात एक लाख ५ हजार पर्यटकांनी कासला भेट दिली. शनिवार-रविवार तसेच शासकीय सुटीच्या दिवशी १५ ते २० हजार पर्यटकांची पठारावर गर्दी असे. या लोंढ्यांना आवरणे स्थानिक कर्मचारी व वन विभागासाठी अशक्य कोटीतील गोष्ट होती. पर्यटकांच्या लोंढ्यांचा कासच्या धारण क्षमतेवर ताण येत होता. शिवाय सातारा-कास रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांच्या गैरसोयीत भर पडत होती.

कासच्या जैवविविधतेचे रक्षण-संवर्धनासाठी नियंत्रित पर्यटनावर वनविभागाने जोर दिला. एका दिवसाला तीन हजारांपेक्षा अधिक पर्यटकांना पठारावर प्रवेश देऊ नये, अशी स्वयंशिस्त लावण्याचा प्रयत्न तत्कालीन उपवन संरक्षक अनिल अंजनकर यांनी केला. यावर्षी नूतन उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी या उपक्रमाला बळ दिले. टप्प्याटप्प्याने का होईना हा प्रयोग जनमाणसात रुजू लागला आहे. वन विभागाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये ५० हजार ७३६, २०१७ मध्ये ३३ हजार ९३१ तर २०१८ च्या हंगामात ४२ हजार ६१४ पर्यटकांनी आॅनलाईन बुकिंग करून कासची शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला.
 


‘आॅनलाईन बुकिंग’मुळे केवळ सुटीच्या दिवशी होणारी गर्दी इतर दिवशी विखुरली गेली. परिणामी येथे येणाऱ्या पर्यटकांना गैरसोय टाळून अधिक चांगल्या सुविधा आणि निसर्गाचा आनंद घेता येत आहे. त्यामुळे यंदा वाहतुकीची कोंडी आणि पर्यटकांची गैरसोय टाळण्यात कास पठार कृती समिती यशस्वी झाली.
- सोमनाथ जाधव, अध्यक्ष.

Web Title:  45 thousand tourists 'online' plateau: Kass plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.