मातब्बरांमध्ये प्रतिष्ठेच्या लढाईसाठी संघर्ष अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:15 AM2018-06-26T00:15:53+5:302018-06-26T00:17:20+5:30

औद्योगिक वसाहतीलगत आणि शहराच्या उत्तरेच्या बाजूच्या विस्तारित गुंठेवारी भागाने व्यापलेल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजप आदी पक्षामधून इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत

The struggle for the prestigious battle between the Matils is inevitable | मातब्बरांमध्ये प्रतिष्ठेच्या लढाईसाठी संघर्ष अटळ

मातब्बरांमध्ये प्रतिष्ठेच्या लढाईसाठी संघर्ष अटळ

Next

महालिंग सलगर ।
कुपवाड : औद्योगिक वसाहतीलगत आणि शहराच्या उत्तरेच्या बाजूच्या विस्तारित गुंठेवारी भागाने व्यापलेल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजप आदी पक्षामधून इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. मात्र, या नव्याने तयार झालेल्या प्रभागात आजी-माजी उपमहापौरांबरोबरच विरोधी पक्षनेते, माजी स्थायी समिती सभापती, माजी गटनेते आदींनी हा प्रभाग काबीज करण्यासाठी कंबर कसल्याने निवडणूक संघर्ष अटळ असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

माजी उपमहापौर प्रशांत पाटील, विद्यमान उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक धनपाल खोत, नगरसेविका निर्मला जगदाळे, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांचा जुन्या वॉर्डातील भाग एकत्र करून हा नवा प्रभाग झाला आहे. तसे या प्रभागावर काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. तरीही या पाच वर्षात राजकीय परिस्थिती बदलली असून, इतरही राजकीय पक्ष व संघटनांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

काँग्रेसचे माजी उपमहापौर प्रशांत पाटील, उपमहापौर विजय घाडगे, माजी उपमहापौर मोहन जाधव, राष्टवादीचे ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत हे या प्रभागातून इच्छुक आहेत. दिलीप सूर्यवंशी गटही येथे इच्छुक आहे. राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते यांनी तयारी केली असली तरीही भाजपचे रवींद्र सदामते यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.
राष्ट्रवादीच्या रईसा मुश्ताकअली रंगरेज, परवेज मुलाणी हेही इच्छुक तयारी करीत आहेत. भाजपकडून विश्वजित पाटील, माया गडदे, अजित जगताप, सुधार समितीमधून सचिन चोपडे या इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जनता दलाकडून सिंधूताई मोहन जाधव, काँग्रेसकडून धनश्री संतोष रूपनर, धनश्री राहुल रूपनर यांची नावे चर्चेत आहेत.

नैसर्गिक नाल्याचा प्रश्न गंभीर
कुपवाड शहरात या प्रभागात बामणोलीकडून येणारा मोठा नैसर्गिक नाला वाहतो. या नाल्यावर अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात अनेक घरात पाणी शिरते. या नाल्यावर सूतगिरणीजवळ अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून न जाता तुंबून राहते. त्यातून या परिसरात आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

आरक्षण
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण खुुला

Web Title: The struggle for the prestigious battle between the Matils is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.