बारामती, इंदापूरला जाणारे पाणी थांबवा

By admin | Published: July 17, 2017 12:07 AM2017-07-17T00:07:16+5:302017-07-17T00:07:16+5:30

बारामती, इंदापूरला जाणारे पाणी थांबवा

Stop the water going to Baramati, Indapur | बारामती, इंदापूरला जाणारे पाणी थांबवा

बारामती, इंदापूरला जाणारे पाणी थांबवा

Next


फलटण /लोणंद : नीरा-देवघर धरणाच्या कालव्याची कामे पूर्ण करावीत व बारामती, इंदापूरला जाणारे पाणी थांबवावे, यासाठी रविवारी फलटण आणि लोणंद येथे रास्ता रोको करण्यात आला. फलटण येथे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनादरम्यान २६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. लोणंद येथेही शिरवळ चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी थांबविण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनात फलटण आणि खंडाळा तालुक्यातील शेतकरीही सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणंद : नीरा-देवघर धरणाच्या कालव्याची कामे पूर्ण करावीत व खंडाळा, फलटण तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी लोणंद येथे खंडाळा तालुका पाणी पंचायत व लोणंद शहर काँग्रेसच्या वतीने पाणी पंचायतचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा काढून रास्ता रोको करण्यात आला.
दरम्यान, यावेळी अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांनी बारामतीकर आपल्या ६० टक्के पाण्याचा वापर करीत आहेत, असा हल्ला केला.
येथील गणपती मंदिर ते बसस्थानकासमोरच्या शिरवळ चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात
आला. शिरवळ चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक राजेंद्र डोईफोडे, विकास केदारी, मस्कूअण्णा शेळके, बबनराव शेळके, अशोक डोईफोडे, शरद भंडलकर, झहीर बागवान, उमेश खरात, इम्रान बागवान, अरुण भंडारी, शिवाजी धायगुडे, बाळासाहेब शेळके, बबन ठोंबरे, सर्फराज बागवान, प्रकाश केसकर, अण्णा आधव, शामराव धायगुडे, विलास करंजे, नारायण लोखंडे,
रमेश कर्णवर, प्रवीण भंडलकर, अशरफ शेख आदी उपस्थित होते. या मोर्चानतंर गणपती मंदिर येथे बैठक झाली.

Web Title: Stop the water going to Baramati, Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.