टंचाईची झळ अन् पडळकरांची कळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:53 PM2018-12-21T23:53:28+5:302018-12-21T23:53:37+5:30

दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : आगामी निवडणुकीच्या तोंडावर सावळज पूर्व भागातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. पंधरा ...

The scarcity of the key! | टंचाईची झळ अन् पडळकरांची कळ!

टंचाईची झळ अन् पडळकरांची कळ!

googlenewsNext

दत्ता पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : आगामी निवडणुकीच्या तोंडावर सावळज पूर्व भागातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. पंधरा वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या राष्टÑवादीच्या कारभाºयांनी गुरुवारी पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण केले.
तासगाव तालुक्यातील भाजप आणि राष्टÑवादीसाठी हा अनुभव नवखा नाही. मात्र टंचाईची झळ लागत असतानाचा भाजपशी फारकत घेतलेले आटपाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पहिल्यांदाच सावळजमध्ये येऊन खासदारांची काढलेली कळ मात्र चर्चेचा विषय ठरली आहे.
तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाण्याचा प्रश्न सातत्याने चर्चेत असतो. दुष्काळाचे खापर फोडण्यापासून ते झालेल्या कामाचे श्रेय घेण्यापर्यंत सर्वच मुद्द्यांवर राजकारण फिरलेले असते. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विसापूर, पुणदी योजनेच्या माध्यमातून काही गावांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे आकस्मिक निधन आणि राज्यासह देशातील सत्तांतर यामुळे राजकीय समीकरणे बदलली. त्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे तालुक्यातील जनतेच्या नजरा लागल्या.
सावळजसह परिसरातील गावांतील शेतकºयांकडून सातत्याने टेंभू योजनेत समावेशाची मागणी केली जात होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतदेखील सर्वच नेत्यांनी पाणीप्रश्न अस्मितेचा विषय केला होता. मात्र या भागात अद्याप पाणी आले नाही. किंबहुना काही गावांचा समावेश झाला, तर काही गावांचा समावेश झाला नाही. निवडणुकीच्या काळात आश्वासन देणाºया नेत्यांना प्रत्यक्षात पाणीप्रश्न मार्गी लावण्यात अपयश आले.
आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच, गुरुवारी राष्टÑवादीच्या कारभाºयांनी लाक्षणिक उपोषण करून पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावरुन बिगुल वाजवले. तालुक्यात गेल्या साडेचार वर्षात राष्टÑवादीने अनेक आंदोलने केली. मात्र सावळजचे आंदोलन भलतेच चर्चेत आले आहे.
भाजपचे एकेकाळचे स्टार प्रचारक आणि साडेचार वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीवेळी आर. आर. पाटील यांना ‘टार्गेट’ करणाºया गोपीचंद पडळकर यांनी सावळजच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. विशेषत: खासदार पाटील यांच्यावर निशाणा साधत, आमदार सुमनतार्इंच्या पाठीशी भाऊ म्हणून उभे राहण्याचे आश्वासन दिले.
गेल्या काही महिन्यांपासून खासदार आणि पडळकर यांच्यात संधी मिळेल तिथे एकमेकांवर तोंडसुख घेणे सुरू असतानाच, आता पडळकर यांनी थेट खासदारांच्या तालुक्यात येऊन, राष्टÑवादीच्या आमदारांना पाठबळ देत, खासदारांना आव्हान दिल्यामुळे, नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: The scarcity of the key!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.