सांगली, माधवनगरला आठ घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:55 PM2017-10-14T14:55:21+5:302017-10-14T15:09:24+5:30

Sangli, Madhavnagar, has broken eight homes | सांगली, माधवनगरला आठ घरे फोडली

सांगली, माधवनगरला आठ घरे फोडली

googlenewsNext
ठळक मुद्देचोरट्यांचा धुमाूकळ ६० हजाराचा ऐवज लंपासघरांना बाहेरुन कड्या लावल्या

सांगली : माधवनगर रस्त्यावरील शिवोदयनगर आणि माधवनगर (ता. मिरज) येथे चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री भरपावसात धुमाकूळ घालत आठ घरे फोडली. अनेक घरांना बाहेरुन कड्या लाऊन घेतल्याने नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. केवळ ज्येष्ठ पत्रकार दिलीप भिसे यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ६० हजाराचा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला.


माधवनगर रेल्वे स्थानकाजवळ शिवोदयनगर आहे. मध्यरात्री चोरट्यांनी प्रथम पत्रकार दिलीप भिसे यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजातून घरात प्रवेश केला. भिसे यांच्या कुटूंबातील काही लोक पहिल्या तर काहीजण दुसºया मजल्यावर झोपले होते. चोरट्यांनी कपाटाच्या चाव्या घेऊन कपाट उघडले. लॉकरमधील सोन्याच्या अर्ध्या तोळ्याच्या दोन अंगठ्या, चांदीचा छल्ला व पाच हजाराची रोकड असा ऐवज लंपास केला.

सांगलीत हॉटेलचालक महिलेस खंडणीसाठी धमकावले

http://www.lokmat.com/sangli/sangli-hoteler-threatens-woman-ransom/

अमरावतीमध्ये दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी पाडला हाणून, आठ गजाआड

http://www.lokmat.com/amravati/police-have-tried-douse-robbery-amravati-eight-inmates/

टेबलवर दोन मोबाईल होते. पण चोरट्यांनी त्याला हात लावला नाही. भिसे यांच्या शेजारी पत्रकार अविनाश कोळी यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील कापण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. याचठिकाणी अरुण गायकवाड यांच्या घराचे प्रवेशद्वार चोरट्यांनी तोडले. घरातील लोक उठल्याची चाहूल लागल्याने चोरटे पळून गेले. शनिवारी सकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

माधवनगरमध्ये भगत गल्लीतही चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. बापू गायकवाड हे कुटूंबासह दोन दिवसापूर्वी परगावी गेले आहे. याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरही उघडले. गायकवाड कुटूंब नसल्याने घरातून काय चोरीला गेले आहे, हे समजू शकले नाही. हे कुटूंब रविवारी परगावाहून येणार आहे.

याचठिकाणी उल्हास गायकवाड, प्रदीप गायकवाड यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला. तेथील जालिंदर पाटील यांच्यासह चार ते पाच घरांना चोरट्यांनी बाहेरुन कड्या लाऊन घेतल्या होत्या. व्यापारी गणपत पाटील यांचे खारीक व खोबºयाचे गोदामही फोडले आहे. पण चोरीला काहीच गेले नाही. घटनास्थळी चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकास पाचारण केले होते. रात्री मुसळधार पाऊस झाल्याने श्वान परिसरातच बराच वेळ घुटमळले.

Web Title: Sangli, Madhavnagar, has broken eight homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.