अमरावतीमध्ये दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी पाडला हाणून, आठ गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 04:50 PM2017-09-27T16:50:23+5:302017-09-27T16:50:52+5:30

Police have tried to douse the robbery in Amravati, eight inmates | अमरावतीमध्ये दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी पाडला हाणून, आठ गजाआड

अमरावतीमध्ये दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी पाडला हाणून, आठ गजाआड

Next

 अमरावती - गॅसकटर, लोखंडी रॉड, टॉमी व तलवारीच्या धाकावर एखाद्या बड्या गोडावूनला फोडून त्यातून मुद्देमाल लंपास करण्याच्या बेतात असलेल्या आठ आरोपींना बडनेरा पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास अकोला महामार्गावर अटक केली. 
युसूफ खान कुदुस खान (३२) शेख अलीम शेख कलीम (२१, दोघे चमननगर, बडनेरा) अब्दुल समीर अब्दुल जमील (१९) अब्दुल शहबाज अ रफीक (१८) परवेज खान आसिफ खान (१८) नावेद खान अजमत खान (२०) सैयद साजिद सैयद सब्बदर (२६) शेख सलमान शेख आसिफ (१९, सर्व रा. ताजनगर गुलिस्तानगर अमरावती) असे आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारच्या मध्यरात्री बडनेरा पोलीस अकोला मार्गावर गस्तीवर होते. आरको गॅरेजसमोर काही तरुण त्यांना दृष्टीस पडले. पोलीस आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून ते  पसार होत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांच्याकडे गैसकटर, तलवार, चाकू, लोखंडी रॉड, टॉमी, दोर, माचिस, ७ मोबाईल आढळून आले. यासोबतच त्यांच्याजवळ दोन दुचाक्या एक मालवाहू गाडीदेखील होती. 
अटकेनंतर अमरावतीचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर सर्व आरोपींना हजर करण्यात आले. यावेळी त्यांनी मोठा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. हे सर्राइत गुन्हेगार आहे का, हे पोलीस तपासणार आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीपसिंह पाटील, उपनिरीक्षक संजय आत्राम व इतर गस्तीवरील पोलीस कर्मचाºयांनी केली. यासर्व आरोपीवर कलम ३९९, ४/२४ आर्म एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडनेरा ठाण्यांतर्गत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Police have tried to douse the robbery in Amravati, eight inmates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.