सांगली : गुंड सचिन सावंत टोळीला मोक्का, पोलिसप्रमुखांचा दणका : दहाजणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:57 AM2017-12-19T11:57:39+5:302017-12-19T12:00:06+5:30

खून, खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या माजी नगरसेवक व गुंड सचिन सावंत टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत सोमवारी कारवाई करण्यात आली. मोक्का लागलेल्यांमध्ये टोळीतील दहाजणांचा समावेश आहे.

Sangli: A gang of Sachin Sawant gang, Mokka, police chief's bogie: Ten people included | सांगली : गुंड सचिन सावंत टोळीला मोक्का, पोलिसप्रमुखांचा दणका : दहाजणांचा समावेश

सांगली : गुंड सचिन सावंत टोळीला मोक्का, पोलिसप्रमुखांचा दणका : दहाजणांचा समावेश

googlenewsNext
ठळक मुद्देकळंबा कारागृहातून अटक करणारआणखी काही टोळ्या रडारवरदुसऱ्यांदा मोक्का

सांगली : खून, खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या माजी नगरसेवक व गुंड सचिन सावंत टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत सोमवारी कारवाई करण्यात आली. मोक्का लागलेल्यांमध्ये टोळीतील दहाजणांचा समावेश आहे.

सचिन रमाकांत सावंत (वय ४१), शाम बापू हत्तीकर (२६), सौरभ संजीवकुमार शितोळे (२०), करण बाळू शिंदे (१९), माजिद ऊर्फ इम्रान मज्जिद आवटी (२६), सिद्धार्थ भास्कर कांबळे (२८), विशाल ऊर्फ गौरव विजय गायकवाड (२८), नागेश विजय ऐदाळे (२९, सर्व रा. पारिजात कॉलनी, सावंत प्लॉट, सांगली) व सुनील नारायण कांबळे (२५, शंभरफुटी रस्ता, सांगली) अशी मोक्का लागलेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, सावकारी, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे नोंद आहेत.

सावंत टोळीने २२ सप्टेंबर २०१७ रोजी टोळीयुद्धातून गुंड बाळू भोकरे व शकील मकानदार या दोघांवर खुनीहल्ला केला होता. यामध्ये शकीलचा मृत्यू झाला होता, तर बाळू भोकरे पळून गेल्याने बचावला होता. टोळीने बाळू भोकरेच्या अभिजित भोकरे व अक्षय शिंदे या दोन साथीदारांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. त्यांच्या दुचाकींची मोडतोड केली होती. मराठा सेवा संघाच्या कार्यालयासमोर भरदिवसा ही थरारक घटना घडली होती. आर्थिक वादातून हा खून झाल्याचे कारण पोलिस तपासातून पुढे आले होते.

याप्रकरणी बाळू भोकरे याची फिर्याद घेऊन पोलिसांनी गुंड सचिन सावंतसह दहाजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या साथीदारांना तातडीने अटक केली होती. पण सचिन सावंत गुंगारा देत फरारी राहिला. गेल्या महिन्यात त्याला अटक करण्यात यश आले होते. सध्या सर्वजण कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात आहेत.

सावंत टोळीविरुद्ध यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती काढण्याचे आदेश जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुन्हे अन्वेषण विभाग व विश्रामबाग पोलिसांना दिले होते. दोन्ही विभागाच्या पोलिसांनी सावंतसह दहाजणांविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती काढून शर्मा यांना सादर केली होती. त्यानंतर शर्मा यांनी सावंत टोळीविरुद्ध मोक्का कायद्याखाली कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सादर केला होता.

नांगरे-पाटील यांनी सोमवारी सावंत टोळीला मोक्का लावण्यास मंजुरी दिली आहे. सध्या सावंत टोळी कळंबा कारागृहात आहे. त्यांना मोक्काच्या गुन्ह्यात अटक केली जाणार आहे. यासाठी त्यांना कळंबा कारागृहातून ताब्यात घेतले जाणार आहे. शहर विभागाचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील हे अधिक तपास करणार आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने, विश्रामबागचे निरीक्षक प्रताप पोमण, उपनिरीक्षक जीवन राजगुरु, पोलिस नाईक विशाल भिसे, अभिजित गायकवाड यांंनी संयुक्तपणे ही कारवाई केली. गेल्या सहा महिन्यात गुन्हेगारांवरील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

आणखी काही टोळ्या रडारवर

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी मोक्का, तडीपार व झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी आणखी काही टोळ्या ह्यरडारह्णवर आहेत.

या टोळ्यांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. पुढील आठवड्यात एका टोळीला मोक्का लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अहवाल नांगरे-पाटील यांना सादर करण्यात आला आहे.

दुसऱ्यांदा मोक्का

सचिन सावंत हा दिवंगत नगरसेवक दादासाहेब सावंतचा भाऊ आहे. सचिन सावंत, दादासाहेब सावंत व बाळू भोकरेला तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख रितेशकुमार यांनी मोक्का लावला होता. सचिनला दुसऱ्यांदा मोक्का लागला आहे.

 

Web Title: Sangli: A gang of Sachin Sawant gang, Mokka, police chief's bogie: Ten people included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.