अनिल कस्तुरे टोळीस मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:14 AM2017-12-05T01:14:24+5:302017-12-05T01:20:35+5:30

Anil Kasturi Tulsi Mokka | अनिल कस्तुरे टोळीस मोक्का

अनिल कस्तुरे टोळीस मोक्का

googlenewsNext


सातारा : जबरी चोरी, दहशत निर्माण करून गुन्हे करणाºया करंजेपेठेतील अनिल महालिंग कस्तुरे याच्यासह त्याच्या टोळीतील सदस्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, करंजे पेठेतील अनिल कस्तुरे याने टोळीच्या माध्यमातून नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. कस्तुरे याच्या टोळीचा त्रास वाढला होता. असे असतानाच कस्तुरे याने मटका व्यवसाय सुरू करण्यासाठी एकाकडे एक लाख रुपये मागितले होते. हे पैसे न दिल्याच्या कारणावरून कस्तुरेने ६ जून २०१७ रोजी फोनवरून संबंधिताला दमदाटी केली होती. त्यानंतर सायंकाळी पैसे न दिल्याच्या कारणावरून कस्तुरे याने संबंधितास मारहाण करत साडेपाच हजारांची रोकड तसेच दुचाकी जबरदस्तीने नेली होती. याप्रकरणी कस्तुरे याच्यासह त्याचा साथीदार अक्षय सुनील जाधव ऊर्फ अक्षय बॉम्बे (रा. बसाप्पा पेठ, करंजे सातारा) याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. अशा गुन्ह्यांमुळेच कस्तुरे व टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोरेगावच्या पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे या तपास करीत आहेत.
आतापर्यंत सात टोळींवर कारवाई
याआधी पोलिसांनी जिल्ह्यातील सहा टोळींवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये खंड्या धाराशिवकर, महेंद्र तपासे, अमित ऊर्फ सोन्या देशमुख, आकाश खुडे, शेखर गोरे, आशिष जाधव यांच्या टोळीचा समावेश होता. आता कस्तुरे टोळीवर कारवाई झाली आहे. त्यामुळे कारवाई झालेल्या टोळींची संख्या सातवर पोहोचली आहे.
प्रस्तावास मंजुरी
कस्तुरे याच्या विरोधात असणाºया गंभीर गुन्ह्यांची संख्या लक्षात घेत त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांना सादर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.

Web Title: Anil Kasturi Tulsi Mokka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा