ठळक मुद्दे घटनेच्या निषेधार्थ कोकरुड, माळेवाडीत बंद, रास्ता रोको सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी लगावल्या वृध्दाच्या कानशिलातसांगली येथील दंगल नियंत्रण पथक कोकरुड मधे दाखलबळाचा वापर करत पोलिसांनी घेतले ताब्यात

कोकरुड : कोकरुड येथील सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांच्यावर केरु महादेव जाधव यांना मारहाण व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कोकरुड व माळेवाड़ी येथे गुरुवारी कडकडित बंद पाळण्यात आला, परंतु २0 त २५ आंदोलकांना बळाचा वापर करत ताब्यात घेत पोलिसांनी हे आंदोलन चिरडले.


कोकरुड येथील पोलिस ठाण्याजवळील माळावर जनावरे चरण्यास घेऊन आलेल्या एका शेतकºयास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल झाली होती. माळेवाडीतील शेतकरी केरू महादेव जाधव (वय ७८) यांनी फिर्याद दिल्यानंतर तसेच ग्रामस्थांच्या दबावानंतर शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकारणाच्या निषेधार्थ गुरुवारी कोकरुड आणि माळेवाडी येथे बंद पुकारण्यात आला होता.


दरम्यान, कोकरुड येथे रास्ता रोको करणाºया आंदोलकांनी जो पर्यंत अधिकाºयांचे निलंबन होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका घेतल्याने २0 त २५ आंदोलक स्त्री-पुरुषांना बळाचा वापर करत पोलिसांनी ताब्यात घेत हे आंदोलन चिरडले. आंदोलकांना पोलिस गाडीत बसवून नेण्यात आले. सांगली येथील दंगल नियंत्रण पथक कोकरुड मधे दाखल झाले होते.

माळेवाडी-कोकरुड येथील वयोवृध्द शेतकरी केरू महादेव जाधव हे कोकरुड पोलिस स्टेशनच्या लगत असणाºया माळावर बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास जनावरे चरावयास घेऊन गेले होते. जनावरे चरत असताना पोलिस स्टेशनच्या दोन कर्मचाºयांनी जाधव यास साहेब बोलावत असल्याचे सांगितले. त्यानंतर केरू जाधव पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी भगवान शिंदे यांनी ह्यये थेरड्या, इकडे जनावरे का चरायला आणला आहेस असे म्हणत त्याच्या कानशिलात लगावल्या. यामुळे जाधव जमिनीवर कोसळले.

हा प्रकार काही ग्रामस्थांनी पाहिला व त्यांनी गावात याबाबतची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर कोकरुड व माळेवाडी येथील सर्व आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याच्या आवारात धाव घेतली. त्यावेळी जाधव हे चक्कर येऊन पडल्याचे सांगण्यात आले. यावर लोकांचा विश्वास न बसल्याने जाधव यांच्याकडून माहिती घेतली असता, शिंदे यांनी मारहाण आणि शिवीगाळ केली. यामुळेच आपण बेशुध्द पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर शिंदे यांच्याकडे विचारणा केली; मात्र त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली नसल्याचे सांगितले. शिंदे हे खोटे बोलत असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांनी दोन तास घेराव घातल्यानंतर शिंदे यांच्यावर त्यांच्याच पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी कोकरुड व माळेवाडी बंद ठेवण्यात आले.