नातवाच्या लग्नात बँजोच्या दणक्याने आजोबाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:20 AM2018-07-21T05:20:53+5:302018-07-21T05:21:00+5:30

नातवाचा लग्नात मोठ्या कौतुकाने लावलेल्या महाकाय लाऊडस्पिकरवर बँजोचे कानठळे बसविणारे दणके सुरू झाले

Grandfather's death by grandfather's wedding | नातवाच्या लग्नात बँजोच्या दणक्याने आजोबाचा मृत्यू

नातवाच्या लग्नात बँजोच्या दणक्याने आजोबाचा मृत्यू

Next

कुरळप (जि.सांगली) : नातवाचा लग्नात मोठ्या कौतुकाने लावलेल्या महाकाय लाऊडस्पिकरवर बँजोचे कानठळे बसविणारे दणके सुरू झाले आणि त्यामुळे हृदयविकाराच्या धक्का येऊन आजोबांचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे ही घटना घडली. काशिनाथ सखाराम सुतार (वय ७५) असे मृताचे नाव असून, अक्षतांना अवघा पंधरा मिनिटांचा वेळ बाकी असताना अनियंत्रित आवाजाच्या दणक्याने त्यांचा बळी घेतला.
शिवाजी काशिनाथ सुतार यांचा मुलाचे लग्न गुरुवारी, दुपारी अडीच वाजता होते. त्यानिमित्त घरासमोर सकाळपासूनच बँजो पथकाला पाचारण करण्यात आले होते. बँजो पथकासोबत मोठमोठाले लाऊडस्पिकर होते. त्याचा महाकाय आवाज अक्षरक्ष: हृदयात धडकी भरवणाराच होता. सहन न होणाऱ्या या आवाजाबाबत वºहाडातील अनेकांनी तक्रारीदेखील केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत या आवाजासोबत नवरदेवाची वरात गावदैवतांचे दर्शन घेऊन लग्नमंडपात परतली. तेथेही नवरदेवाच्या मित्रांनी बँजोच्या मोठ्या आवाजातील गाण्यावर ताल धरला.

Web Title: Grandfather's death by grandfather's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू