दुर्योधन, दु:शासन युती होऊनही भाजप अजिंक्य: सुरेश हाळवणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:08 PM2018-08-07T23:08:17+5:302018-08-07T23:08:21+5:30

Duryodhana, despite being a coalition government, BJP Ajinkya: Suresh Halvankar | दुर्योधन, दु:शासन युती होऊनही भाजप अजिंक्य: सुरेश हाळवणकर

दुर्योधन, दु:शासन युती होऊनही भाजप अजिंक्य: सुरेश हाळवणकर

Next

सांगली : दुर्योधन व दु:शासन हे एकत्रित येऊनही त्यांना महापालिकेत भाजपला विजयापासून रोखता आले नाही. तसेच मित्रपक्ष म्हणविणाऱ्या शिवसेनेचीही चांगलीच फसगत झाली, अशी टीका पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी पक्षीय पदाधिकाºयांच्या मेळाव्यात मंगळवारी केली.
सांगलीत पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, माजी आमदार दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.
हाळवणकर म्हणाले की, महाराष्टÑातील जनतेचा कौल हा भाजपच्याच बाजूने मिळत आहे. बुथनिहाय तयारी करण्यात आल्यानेच हे यश आपल्या पदरी पडले आहे. आपल्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी हे दुर्योधन आणि दु:शासन होते. त्याचप्रमाणे स्वबळाचा नारा देणारा शिवसेना हा पक्षदेखील होता. त्यामुळे कोणीही आपल्यासमोर उभे ठाकले तरी, त्यांचा पराभवच होतो, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या हातात सत्तासूत्रे आल्याने आता शहराचा हमखास विकास होईल.
मराठा आरक्षणासंदर्भात हाळवणकर म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ज्वलंत आहे. प्रस्थापित मराठा नेत्यांच्या शिक्षण संस्था, कारखाने, तसेच अन्य व्यवसाय आहेत. परंतु त्यांनी मराठा समाजातील लोकांना आजपर्यंत काहीही दिलेले नाही. याचा संताप आंदोलकांच्या मनात आहे. आरक्षण देण्यास फडणवीस सरकार बांधील आहे. मध्यंतरी एक मोर्चा मुंबईत सरकारच्या विरोधात काढण्यात आला होता. त्यानंतर सरकारने त्याला अपेक्षित प्रतिसाद दिला.
मराठा समाज जागरुक आहे. कॉँग्रेस सरकारने २०१४ मध्ये आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला. मात्र तो न्यायालयात टिकला नाही. साहजिकच फडणवीस सरकारने त्या अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात केले व नोव्हेंबरअखेरपर्यंत आरक्षणाविषयी ठोस निर्णय घेतला जाईल, एवढेच नव्हे, तर धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात देखील मार्ग काढला जाईल, असे सांगितले.
देशमुख म्हणाले की, महापालिका जिंकण्यासाठी ज्याप्रमाणे शहरातील कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली, त्याच पध्दतीने ग्रामीण भागातील विस्तारक व कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. महापालिका निवडणुकीतील यशामुळे भाजप कार्यकर्त्यांत ऊर्जा निर्माण झाली आहे. महापालिका ताब्यात आल्याने खºयाअर्थाने जिल्हा भाजपमय झाला आहे. आता लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने याची तयारी सुरु झाली आहे.
शिवसेना स्वतंत्र : नावालासुद्धा नाही
मित्रपक्ष म्हणविणाºया शिवसेनेनेसुद्धा महापालिका निवडणुकीत त्यांची ताकद अजमाविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तब्बल ५२ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मात्र त्यातील ९० टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. एकाही जागेवर त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे आमच्यासमोर कोणाचीही डाळ शिजली नाही, असे हाळवणकर यांनी यावेळी सांगितले.
तंत्रज्ञानाशी जवळीक करा!
भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता अद्ययावत तंत्रज्ञानाशी परिचित असला पाहिजे. पंतप्रधानांनी ‘नमो अ‍ॅप’ विकसित केले आहे. ते कितीजणांकडे आहे? असा प्रश्न हाळवणकर यांनी विचारताच, सभागृहातील फारच कमी हात वर आले. त्यामुळे हाळवणकर यांनी मेळाव्यातच सर्वांकडून अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले.

आज विजयी मेळावा
सांगली : नुकत्याच झालेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यानंतर या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सांगलीत ८ आॅगस्ट रोजी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, भाजपचे प्रदेश संघटन प्रमुख रघुनाथ कुलकर्णी, रवी अनासपुरे यांच्यासह राज्य व जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार आहेत. महापालिका निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनीच विजयोत्सव साजरा केला होता. नेतेमंडळींना एकत्रित येता आले नव्हते. त्यामुळेच मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Web Title: Duryodhana, despite being a coalition government, BJP Ajinkya: Suresh Halvankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.