ताकारी योजनेचा खर्च सातशे कोटींच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:40 PM2018-04-08T23:40:45+5:302018-04-08T23:40:45+5:30

The cost of the Taka plan is Rs. 700 crores | ताकारी योजनेचा खर्च सातशे कोटींच्या घरात

ताकारी योजनेचा खर्च सातशे कोटींच्या घरात

Next

अतुल जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
देवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव या तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या ताकारी योजनेच्या कामावर १७-१८ या वर्षात फक्त २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांनी केलेल्या शेकडो कोटींच्या घोषणा खोट्या ठरताना दिसत आहेत. या योजनेवर शासनाने आजअखेर ६८८ कोटींचा खर्च केला आहे. तरीही अजून योजना पूर्ण होण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी गरजेचा आहे.
ताकारी योजनेच्या कामावर शासनाने आजअखेर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला; पण योजना अजूनही अपूर्ण आहे. गेल्या ३५ वर्षांपासून योजनेची कामे चालू आहेत; मात्र तेव्हापासून योजनेचा विस्तारही वाढत गेला आहे. प्रत्येक नेत्याने आपल्या मतदार संघातील हक्काची गावे ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील घालण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या योजनेत चार तालुक्यातील ५१ गावांतील शेतीचा समावेश आहे. तासगाव व खानापूर तालुक्यातील अनेक गावांत कालवा खुदाईचे काम गतीने चालू आहे, तर कडेगाव तालुक्यातील तडसर, हिंगणगाव खुर्द येथील कालवा, पोटकालव्याची कामे चालू आहेत. पलूस-खानापूर तालुक्यातील गावांचा समावेश असलेली नवीन वितरिकावरील कामेही चालू आहेत.
या योजनेच्या माध्यमातून १०८ किलोमीटरपर्यंतच्या गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. या परिसरातही कालवा दुरुस्ती, पोटपाट खुदाई, दारे बसविणे यासह विविध कामे अपूर्ण आहेत. यावरही शासनाने खर्च करणे गरजेचे आहे. अपूर्ण कामे जलदगतीने पूर्ण न केल्यामुळे योजनेचे बजेट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
अनेक नेत्यांनी योजनेस यावर्षी शेकडो कोटी निधी देण्याची घोषणा केली; होती पण या योजनेस यावर्षी फक्त २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
२०० कोटींची गरज
ताकारी योजनेचा कालवा, पोटकालवा खुदाई, दारे बसविणे यासह विविध कामे पूर्ण होण्यासाठी व शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी देण्यासाठी अजून २०० कोटींची गरज असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: The cost of the Taka plan is Rs. 700 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली