आष्ट्याजवळ अपघातात पडवळवाडीचा युवक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 08:25 PM2024-02-20T20:25:52+5:302024-02-20T20:26:10+5:30

आष्टा: आष्टा इस्लामपूर मार्गावर शिंदे मळ्याजवळ केमिकल ट्रक व मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत अतुल अशोक कदम ...

A youth of Padwalwadi was killed in an accident near Ashtya | आष्ट्याजवळ अपघातात पडवळवाडीचा युवक ठार

आष्ट्याजवळ अपघातात पडवळवाडीचा युवक ठार

आष्टा: आष्टा इस्लामपूर मार्गावर शिंदे मळ्याजवळ केमिकल ट्रक व मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत अतुल अशोक कदम वय २७ राहणार पडळवाडी ता वाळवा या युवकाच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडली.

आष्टा पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अतुल कदम हा कोल्हापूर येथे हॉटेल कामगार असून तो पडवळवाडी गावी आईला भेटण्यासाठी आला होता. आज दुपारी कोल्हापूर कडे कामासाठी मोटरसायकल क्रमांक एम एच १० ई सी ६९४७ वरून जात असताना इस्लामपूर आष्टा मार्गावर नवीन शिंदे मळ्यामजीक समोरून भरधाव वेगात येणाऱ्या केमिकल  ट्रक क्रमांक एम एच १३ डी क्यू ३७०९ व मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत डोक्याला गंभीर मार लागल्याने अतुल कदम जागीच ठार झाले.

अपघातानंतर तातडीने आष्टा पोलीस व रुग्णवाहिका चालक साजन अवघडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती अतुल कदम यांचे शवविच्छेदन आष्टा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत अतुल याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा परिवार आहे.

अतुल कदम यांच्या वडिलांचाही चार वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता त्यानंतर अतुलचाही अपघातात मृत्यू झाला त्यामुळे हळहळ व्यक्त होत होती त्याने हेल्मेट जर घातले असते तर जीव वाचला असता अशी घटनास्थळी चर्चा होती

 

Web Title: A youth of Padwalwadi was killed in an accident near Ashtya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.