वारणा धरणात 18.86 टी.एम.सी. पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 04:55 PM2019-07-15T16:55:42+5:302019-07-15T16:57:56+5:30

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 18.86 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

18.86 TMC in Warna dam Water storage | वारणा धरणात 18.86 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 18.86 टी.एम.सी. पाणीसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देवारणा धरणात 18.86 टी.एम.सी. पाणीसाठाशिराळा तालुक्यात 5.2 मि. मी. पावसाची नोंद

सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 18.86 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 45.52 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 4.62 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 5.43 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 10.08 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 5.68 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी. आहे. अलमट्टी धरणात 95.61 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे.

  1. कृष्णा पूल कराड 7.11 (45),
  2. आयर्विन पूल सांगली 9.6 (40)
  3. अंकली पूल हरिपूर 15.9 (45.11).
     

शिराळा तालुक्यात 5.2 मि. मी. पावसाची नोंद

सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 1.30 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 5.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.

मिरज 0.6, वाळवा-इस्लामपूर 0.6, तासगाव 4.6, शिराळा 5.2, कवठेमहांकाळ 0.2, पलूस 0.5, कडेगाव 0.6, जत, खानापूर-विटा व आटपाडी - निरंक.

Web Title: 18.86 TMC in Warna dam Water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.