कसं आहे तुमचं मूल? त्याची आयक्यू टेस्ट आपण केलीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:53 PM2017-09-21T12:53:19+5:302017-09-21T12:54:28+5:30

कमी आकलनक्षमता असलेल्या मुलांचं भवितव्य आपण लावू शकतो मार्गाला

How is your child? Have you done IQ test? | कसं आहे तुमचं मूल? त्याची आयक्यू टेस्ट आपण केलीत?

कसं आहे तुमचं मूल? त्याची आयक्यू टेस्ट आपण केलीत?

ठळक मुद्देआपलं मुलं कसं आहे, हे समजून घेण्यासाठी सर्वच पालकांनी मुलांची आयक्यू टेस्ट करून घेतली पाहिजे.जी मुलं सर्वसाधारणही नाहीत आणि कमी बुद्धिमानही नाहीत, अशा काठावर असलेल्या मुलांना नेहमीच मोठया समस्यांना तोंड द्यावं लागतंआयक्यू टेस्ट करून घेतलेली असली तर मग त्यावर निश्चितच उपाय शोधता येतो आणि त्यापद्धतीनं मुलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अधिकचे प्रयत्नही करता येतात.

- मयूर पठाडे

प्रत्येकाला आपलं मूल हुशारच हवं असतं किंवा हुशारच वाटत असतं. परंतु दुर्दैवानं प्रत्येकवेळी परिस्थिती तशीच असते असं नाही. कारणं अनेक असतात, पण बºयाचदा काही मुलं नैसर्गिक गणवत्तेपेक्षा कमी गुणवत्तेची असतात. त्यात त्या मुलांचा काहीच दोष नसतो. अगदीच कमी बुद्धिमत्तेची मुलं असली, तर निदान ते लगेच लक्षात तरी येतं, पण जी मुलं अगदी काठावर असतात, त्यांना मात्र खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
मुलांची बुद्धिमत्ता मोजायची कशी? त्यासाठी ‘आयक्यू’ (इंटेलिजंट कोशन्ट) पद्धतीचा, वापर केला जातो. समजा हा आयक्यू शंभर आहे असे मानले तर तर ८५ ते शंभर पर्यंतचा आयक्यू असलेली मुलं सर्वसाधारण मानली जातात. ज्यांचा आयक्यू ७० ते ८५ या दरम्यमान आहे अशी मुलं कमी बुद्धिमत्तेची मानली जातात, तर ज्यांचा आयक्यू ७०च्या खाली आहे अशी मुलं गतिमंद समजली जातात.
आपलं मुलं कसं आहे, हे समजून घेण्यासाठी सर्वच पालकांनी खरंतर मुलांची आयक्यू टेस्ट करून घेतली पाहिजे.
जी मुलं सर्वसाधारणही नाहीत आणि कमी बुद्धिमानही नाही, अशी काठावर असलेली मुलं नेहमीच मोठ्या संकटात सापडतात. कारण बºयाचदा त्यांची आकलनक्षमता कमी आहे, हेच लवकर लक्षात येत नाही.
त्यामुळे आयक्यू टेस्ट करून घेणे हे केव्हाही उत्तम.
अशी आयक्यू टेस्ट करून घेतलेली असली तर मग त्यावर निश्चितच उपाय शोधता येतो आणि त्यापद्धतीनं मुलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अधिकचे प्रयत्नही करता येतात. आजकाल त्याचमुळे अनेक शाळांचा मुलांची आयक्यू टेस्ट करून घेण्याकडे कल असतो आणि त्याबाबत ते पालकांना आग्रहही करीत असतात.
आपलं मूल कसंही असो, त्याची आयक्यू टेस्ट केल्यानं बिघडत तर काहीच नाही, पण समजा दुर्दैवानं जर काही अडचण असलीच, तर ती लवकर लक्षात येऊन ती सुधारता येते आणि आपल्या मुलांचं भविष्यही त्यामुळे काजोळण्यापासून वाचू शकतं..

Web Title: How is your child? Have you done IQ test?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.