मुलं हुशार आहेत, पण त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स कमी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 03:20 PM2017-09-06T15:20:53+5:302017-09-06T15:38:42+5:30

पालक म्हणून ही एक जबाबदारीही आपल्याला पार पाडावी लागेलच..

Children are smart, but they lack emotional intelligence? | मुलं हुशार आहेत, पण त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स कमी का?

मुलं हुशार आहेत, पण त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स कमी का?

googlenewsNext
ठळक मुद्देमुलांच्या भावनांचा प्रतिसाद तीव्र असला, तरीही पालक म्हणून तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे.मुलांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतानाच मुलांनाही त्याबाबत अवगत केलं पाहिजे.मुलांनी त्यांच्या भावनांबाबत मोकळेपणी पालकांशी बोलावं यासाठीचं वातावरण मुलांना उपलब्ध करुन द्यायला हवं.

- मयूर पठाडे

मुलांसाठी काय करायचं आपण बाकी ठेवतो? मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी पालक त्यांना जे जे शक्य असेल, ते ते सारं काही करतात, इतकंच काय, जे अशक्य तेही शक्य करण्याचा प्रयत्न करतात..
पालकांच्या या प्रयत्नांचं यश बºयाचा मुलांच्या कर्तबगारीत दिसतंही. मुलं हुशार होतात, अनेक क्षेत्रात ते भराºया मारतात, त्यात निसंशय पालकांच्या कर्तव्याचा आणि त्यांच्या मेहनतीचा वाटा मोठाच असतो..
पण बºयाचदा मुलं कमी पडतात, ते आपल्या भावभावनांवर कंट्रोल ठेवण्यात. या भावना कशा हाताळायच्या हेच त्यांना कळत नाही. आजकाल तरुण मुलांच्या आत्महत्त्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, त्यामागेही भावनांचा हाच गोंधळ कारणीभूत आहे. आपल्या भावना कशा हाताळायच्या याचं शिक्षणच त्यांना मिळत नाही किंवा त्यात ते कमी पडतात.
आपला इमोशल इंटेलिजन्स वाढावा यासाठी मुलांनी जसे प्रयत्न केले पाहिजेत, तसेच त्यासाठी पालकांनीही त्यांना मदत केली पाहिजे.
इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी काय कराल?
१- सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुलं कोणत्याह्ी पद्धतीनं रिअ‍ॅक्ट झाली, आपल्या भावनांचा त्यांचा प्रतिसाद तीव्र असला, तरीही पालक म्हणून तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे. त्यानं अशा पद्धतीनं प्रतिक्रिया का दिली आणि त्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न.. या गोष्टी त्यानंतर. पण पहिल्यांदा मुलांच्या इमोशन्स समजून घ्या.
२- काही वेळा मुलांनाच आपण भावनांच्या कोणत्या जंजाळात अडकलो आहोत, हे समजत नाही किंवा त्याविषयी ते कुणाशी बोलत नाहीत. अशा वेळी, ‘तुझा आज मूड नाही का? तू आज अपसेट का दिसतो आहेस?, कसली चिंता तुला वाटते आहे?..’ अशा पद्धतीनं मुलांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतानाच मुलांनाही त्याबाबत अवगत केलं पाहिजे.
३- आपल्या मुलांनी त्यांच्या भावनांबाबत पालकांशी बोलावं यासाठी त्यांना कायम प्रोत्साहित करायला हवं.
४- अनेकदा आपण आपलाच विचार करतो, पण त्याच परिस्थितीचा दुसरा व्यक्ती कसा विचार करीत असेल, त्याला काय वाटत असेल, याचा विचारच आपण करीत नाही. दुसºयाच्या भावनांना समजून घेण्याचा परकाया प्रवेश मुलांना साधता आला तर आपल्याही भावनांवर ते उत्तम नियंत्रण ठेऊ शकतात.
५- मुलांमध्ये कुठल्याही कारणानं टेन्शन निर्माण होतंय, ते अपसेट दिसताहेत, हे लक्षात आल्याबरोबर मुलांशी संवाद साधून हे टेन्शन कमी करण्यात जर पालकांचाही हातभार असेल तर पालक आणि मुलं यांच्यातील भावनांचा बंध तर अधिक अतूट होतोच, पण मुलंही अनावश्यक टेन्शनपासून वाचतात.
मुलांमधील इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्याचे आणखीही काही उपाय आहेत, त्याविषयी पाहू या पुढच्या भागात..

Web Title: Children are smart, but they lack emotional intelligence?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.