रत्नागिरी स्थानकावर संतप्त प्रवाशांचा रेलरोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 04:01 AM2018-05-07T04:01:25+5:302018-05-07T04:01:25+5:30

दादर - मडगाव पॅसेंजर रविवारी मध्यरात्री १.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकात आल्यानंतर पुढे न गेल्याने संतप्त प्रवाशांनी रविवारी ४ ते ६ आकस्मिक रेलरोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना समजावत ओखा व कोकणकन्या एक्सप्रेसने त्यांना मडगावला पाठविले.

 Train passengers stranded at Ratnagiri station | रत्नागिरी स्थानकावर संतप्त प्रवाशांचा रेलरोको

रत्नागिरी स्थानकावर संतप्त प्रवाशांचा रेलरोको

googlenewsNext

रत्नागिरी  -  दादर - मडगाव पॅसेंजर रविवारी मध्यरात्री १.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकात आल्यानंतर पुढे न गेल्याने संतप्त प्रवाशांनी रविवारी ४ ते ६ आकस्मिक रेलरोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना समजावत ओखा व कोकणकन्या एक्सप्रेसने त्यांना मडगावला पाठविले. ४ मे पासून रत्नागिरी ते मडगाव व मडगाव ते रत्नागिरी अशी या गाडीची फेरी बंद करण्यात आली आहे. त्याची माहिती कोकण रेल्वेच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. परंतु ही माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचलेली नसल्याने गोंधळ उडाला.

संतापाचा बांध फुटला रत्नागिरी पॅसेंजर पहाटे ४ वाजताच्या सुमारास मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज झाली. त्यामुळे रात्रभर स्थानकावर ताटकळलेल्या प्रवाशांच्या संतापाचा बांध फुटला. पहाटे ४ वा. सुमारे ३०० ते ४०० पुरुष प्रवासी रेल्वे रुळावर उतरले. पूर्ण ट्रॅक अडविण्यात आला. अचानकपणे रेल्वे प्रवाशांनी केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनही अडचणीत आले. रेल्वे पोलीस व रत्नागिरी पोलिसांना स्थिती हाताळण्यासाठी पाचारण करण्यात आले.

Web Title:  Train passengers stranded at Ratnagiri station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.