कशेडी घाटात बर्निंग कारचा थरार, सुदैवाने जिवीतहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 01:48 PM2022-03-15T13:48:52+5:302022-03-15T13:54:40+5:30

प्रसंगावधान राखत प्रवासी कारमधून बाहेर पडल्याने सुखरुप आहेत. मात्र, काही वेळातच या आगीत कार जळून खाक झाली.

The tremor of the burning car in Kashedi Ghat, fortunately escaped death | कशेडी घाटात बर्निंग कारचा थरार, सुदैवाने जिवीतहानी टळली

कशेडी घाटात बर्निंग कारचा थरार, सुदैवाने जिवीतहानी टळली

Next

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

कशेडी घाटात आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या डस्टर कारने अचानक पेट घेतला. कारमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने कार रस्त्याच्या कडेला घेतली. प्रसंगावधान राखत प्रवासी कारमधून बाहेर पडल्याने सुखरुप आहेत. मात्र, काही वेळातच या आगीत  कार जळून खाक झाली.

घटनास्थळी कशेडी पोलीस व सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले आहेत. अद्याप याबाबत सविस्तर माहिती मिळाली नाही.

Web Title: The tremor of the burning car in Kashedi Ghat, fortunately escaped death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.