आराम बसच्या धडकेने रत्नागिरी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 07:32 PM2019-05-18T19:32:07+5:302019-05-18T19:32:25+5:30

बई आणि पुण्याकडे धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांची शहरात रात्री ९ ते ९.३० वाजता लगबग सुरू होते. काँग्रेस भुवन चौकात एक खासगी ट्रॅव्हल्स गाडी मागे घेत असताना महावितरणच्या खांबाला धडकली. परिणामी शहराच्या खालच्या भागाला वीजपुरवठा करणारी मुख्य वाहिनीच तुटली. परिणामी शहरातील वीजपुरवठा साडेतीन तास ठप्प होता.

Relaxation in the darkness of Ratnagiri | आराम बसच्या धडकेने रत्नागिरी अंधारात

आराम बसच्या धडकेने रत्नागिरी अंधारात

Next
ठळक मुद्देआराम बसच्या धडकेने रत्नागिरी अंधारात

रत्नागिरी : मुंबई आणि पुण्याकडे धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांची शहरात रात्री ९ ते ९.३० वाजता लगबग सुरू होते. काँग्रेस भुवन चौकात एक खासगी ट्रॅव्हल्स गाडी मागे घेत असताना महावितरणच्या खांबाला धडकली. परिणामी शहराच्या खालच्या भागाला वीजपुरवठा करणारी मुख्य वाहिनीच तुटली. परिणामी शहरातील वीजपुरवठा साडेतीन तास ठप्प होता.

रात्री ९.३० वाजता खासगी ट्रॅव्हल्स मागे घेत असताना विजेच्या खांबाला धडकली. परिणामी वीजपुरवठा करणारी मुख्य वाहिनी तुटून अन्य वाहिन्यात अडकली. खबरदारी म्हणून वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात आला. परिणामी शहरातील खालचा परिसर अंधारमय झाला.

वीजपुरवठा गायब का झाला, याचा शोध घेत दीडशे ते दोनशे नागरिक घटनास्थळी जमा झाले. महावितरणची यंत्रणादेखील दाखल झाली. क्रेन मागवून बस बाजूला करण्यात आली. त्यानंतर तुटलेली मुख्य वाहिनी अन्य वाहिन्यांमध्ये अडकली होती. मुख्य वाहिनी सुरक्षित सोडविणे आवश्यक होते. क्रेनच्या सहाय्याने चढून कर्मचाºयाने मुख्य वाहिनी सोडविली. रात्री एक वाजता शहरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. उकाड्याने झोप येत नसल्याने नागरिक घटनास्थळी जमा झाले होते.

Web Title: Relaxation in the darkness of Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.