Ratnagiri: The Shiv Sena does not have the power to cancel the project; Nilesh Rane's hinges in Chiplun | रत्नागिरी : शिवसेनेत प्रकल्प रद्द करण्याची धमक नाही, नीलेश राणे यांची चिपळुणात टिका

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला वावदूरदृष्टी नारायण राणेंकडे म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढकाँग्रेसमध्ये व्हिजिटिंग कार्डवाले कार्यकर्ते

चिपळूण : शिवसेना जैतापूर प्रकल्पाला विरोध करत आहे.नाणार प्रकल्पाला विरोध करीत आहेत. उद्धव ठाकरे हा प्रकल्प रद्द करू, असे सांगत आहेत. नाणार प्रकल्पग्रस्तांना डिसेंबरमध्ये प्रकल्प रद्दचे पत्र देतो असे सांगितले होते. मात्र, आता ५ जानेवारीला पत्र देऊ असे सांगत आहेत. परंतु शिवसेनेमध्ये प्रकल्प रद्द करण्याची धमक नाही. शिवसेना पोकळ पक्ष आहे, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी आज चिपळूण येथे जोरदार टीका केली.

राणे पुढे म्हणाले की, आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संस्थापक अध्यक्ष नारायण राणेंनी आपला पक्ष जिल्ह्यात उभा करण्याची संधी दिली आहे. या जिल्ह्यात संघटना उभी करून निवडणुका जिंकू अशी मनात खात्री बाळगून मैदानात उतरलो आहोत, असे सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला वाव आहे. मात्र तेथे त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न येथील लोकप्रतिनिधींकडून होत नाही. यासाठी दूरदृष्टी असावी लागते. ती दूरदृष्टी नारायण राणेंकडे म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन दिवसेंदिवस वाढत आहे, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये पाडापाडीचे राजकारण केले जाते. शिवाय काँग्रेसमध्ये व्हिजिटिंग कार्डवाले कार्यकर्ते चालतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये तसे काही होणार नाही. आम्हाला असे कार्यकर्ते नको आहेत, असेही नीलेश राणे यांनी सांगितले.