रत्नागिरी : रिफायनरीविरोधात राजापुरात कडकडीत बंद, उत्स्फूर्त प्रतिसाद, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:35 PM2017-12-28T14:35:46+5:302017-12-28T14:42:02+5:30

राजापूर तालुक्यातील नाणार व आजूबाजूच्या गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या केंद्र सरकारच्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी रिफायनरी विरोधी शेतकरी-मच्छीमार समितीच्यावतीने एकदिवसीय राजापूर बंद ची हाक देण्यात आली होती. त्याला राजापुरकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आज कडकडीत बंद पाळला.

 Ratnagiri: Rajapur in rajapureur rajapurera cracked off, spontaneous response, police settlement at all | रत्नागिरी : रिफायनरीविरोधात राजापुरात कडकडीत बंद, उत्स्फूर्त प्रतिसाद, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

राजापुरकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आज कडकडीत बंद पाळला.

googlenewsNext
ठळक मुद्देराजापूर शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनातराजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्प रिफायनरी विरोधी शेतकरी-मच्छीमार समितीच्यावतीने राजापूर बंद

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार व आजूबाजूच्या गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या केंद्र सरकारच्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी रिफायनरी विरोधी शेतकरी-मच्छीमार समितीच्यावतीने एकदिवसीय राजापूर बंद ची हाक देण्यात आली होती. त्याला राजापुरकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आज कडकडीत बंद पाळला.



राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या विरोधानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नियोजनस्थळीच होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे हा विरोध आणखीनच वाढला आहे.

ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेला शिवसेनेनेदेखील पाठिंबा दिला असून, प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांसमेवत राहण्याचे शिवसेनेने ठरविले आहे. शिवसेनेच्या पाठिंब्यानंतर आज राजापुरात बंदचे आवाहन करण्यात आले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत राजापुरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. बंदच्या दरम्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता.


जनतेला रिफायनरी प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानाची जाणीव करून देत बंद पाळण्याचे आवाहन करताना राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांचेसह रिफायनरीविरोधी शेतकरी मच्छिमार समिती अध्यक्ष कमलाकर कदम, मजिद भाटकर, ओंकार देसाई, समिती सचिव भाई सामंत, संजय देसाई, गाव आणि मुंबई समन्वय समिती मच्छिमार संघटना सलमान सोलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, शिवसेना राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, राजापूर पंचायत समिती सभापती सुभाष गुरव, शिवसेना राजापूर शहरप्रमुख संजय पवार, उपतालुकाप्रमुख तात्या सरवणकर, राजन कुवळेकर, शिवसेना विभागप्रमुख नरेश दुधवडकर, संतोष हातणकर, युवासेनेचे प्रफुल्ल लांजेकर, भाजपचे महादेव गोठणकर यांचेसह सर्व पंचायत समिती सदस्य, राजापूर नगरपरिषद नगरसेवक, अनेक शिवसैनिक, युवासैनिक आणि समिती सदस्य सहभागी झाले होते.

Web Title:  Ratnagiri: Rajapur in rajapureur rajapurera cracked off, spontaneous response, police settlement at all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.