रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावी..महावितरणचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 04:04 PM2018-09-14T16:04:17+5:302018-09-14T16:06:32+5:30

गणेशोत्सव सुरू झाला आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणण्यात आल्या आहेत. आराशीला सुशोभित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, विद्युत रोषणाई करीत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे.

Ratnagiri: Customers should take precautions during Ganeshotsav period | रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावी..महावितरणचे आवाहन

रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावी..महावितरणचे आवाहन

Next
ठळक मुद्देगणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावीमहावितरणचे आवाहन : विद्युत रोषणाई करताना सावधान

रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू झाला आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणण्यात आल्या आहेत. आराशीला सुशोभित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, विद्युत रोषणाई करीत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे.

गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असली तरी तात्पुरती सवलतीच्या दरात वीजजोडणी घेणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात अवघी १९ आहे. रत्नागिरी शहरात ६, राजापूर १, लांजा १, चिपळूण शहर ४, खेडमध्ये १, दापोली १ मध्ये २, दापोली २ मध्ये १, मिळून १६ जोडण्या घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून सिंगल फेजचे एकूण १० व थ्री फेजचे ६ मिळून १६ जोडण्यांची मागणी केली होती, त्यानुसार महावितरणकडून जोडण्या देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असताना महावितरणने उत्सव कालावधीत महावितरणने सवलतीच्या दरात वीजपुरठा घेण्याचे आवाहन केले आहे. उत्सव कालावधीसाठी सवलतीच्या दरात वीज पुरवठा केला जातो. प्रतियुनिट ४ रूपये ३८ पैसे दराने वीज दर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्सव कालावधीसाठी वीज जोडणी देत असताना अनामत रक्कम घेण्यात येते. अनामत रकमेतून वीज वापराच्या रकमेशिवाय उर्वरित रक्कम संबंधित सार्वजनिक मंडळांना परत करण्यात येणार आहे.

वीज वाहिन्यांसाठी गणेशमूर्ती अडचणीच्या ठरणार नाहीत, अशा प्रकारे ठेवून प्राणांतिक अपघात टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. शिवाय गणपती उत्सवाच्या कालावधीत वीज जोडणी व रोषणाई मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून करण्याचे आवाहन केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विद्युत संचाच्या जोडणीची तपासणी विद्युत निरीक्षकांकडून करून घ्यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी खड्डे करताना वीज वाहिन्या किंवा भूमिगत वाहिन्यांना धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरगुती, सार्वजनिक ठिकाणी वाहिन्या उघड्या राहणार नाहीत, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अखंड वीजपुरवठा

विजेच्या लघुदाब व उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा या देखाव्याला स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावे, तसेच श्रींच्या मिरवणुकीवेळी वीज वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, अशी खबरदारी घ्यावी. उत्सवाच्या काळात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे, असे अधीक्षक अभियंता प्रभाकर पेठकर यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri: Customers should take precautions during Ganeshotsav period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.