रत्नागिरी : बीएसएनएलकडून १२ ठिकाणी नवीन टॉवर, काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 03:01 PM2018-09-26T15:01:04+5:302018-09-26T15:09:30+5:30

भ्रमणध्वनी सेवेत सुधारणा व्हावी, तसेच अति जलद सेवा मिळावी, या उद्देशाने भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल)कडून सप्टेंबर महिन्यात १२ ठिकाणी नवीन टॉवर उभारण्याच्या कामास सुरूवात झाली असून, हे काम प्रगतीपथावर आहे.

Ratnagiri: 12 new towers from BSNL, work in progress | रत्नागिरी : बीएसएनएलकडून १२ ठिकाणी नवीन टॉवर, काम प्रगतीपथावर

रत्नागिरी : बीएसएनएलकडून १२ ठिकाणी नवीन टॉवर, काम प्रगतीपथावर

Next
ठळक मुद्दे बीएसएनएलकडून १२ ठिकाणी नवीन टॉवरकाम प्रगतीपथावर

रत्नागिरी : भ्रमणध्वनी सेवेत सुधारणा व्हावी, तसेच अति जलद सेवा मिळावी, या उद्देशाने भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल)कडून सप्टेंबर महिन्यात १२ ठिकाणी नवीन टॉवर उभारण्याच्या कामास सुरूवात झाली असून, हे काम प्रगतीपथावर आहे.

बीएसएनएलच्या भ्रमणध्वनी सेवेत तसेच इंटरनेट सेवेत सध्या मोठ्या प्रमाणावर व्यत्यय येत आहे. त्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सेवेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने बीएसएनएलच्या येथील कार्यालयाने आॅगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात नवीन टॉवर सुरू करण्यास सुरूवात केली आहे. आॅगस्ट महिन्यात १० ठिकाणी नवीन टॉवर सुरू केले आहेत, तर चार ठिकाणी २ जीऐवजी थ्रीजी सेवा सुरू करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात १५ ठिकाणी नवीन टॉवर सुरू करण्यात येणार असून, ग्रामीण भागात १२ ठिकाणी २जीऐवजी थ्रीजी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील ग्राहकांना अधिक जलद सेवा मिळणार आहे. सध्या हे काम प्रगतीपथावर असल्याचे बीएसएनएल कंपनी सुत्रांकडून सांगण्यात आले. आॅक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाजही व्यक्त होत आहे.

बीएसएनएलने सर्वेक्षण करून ज्या भागात अडचणी येत होत्या, तिथे अधिक क्षमतेचे टॉवर सुरू केले असून, काही भागात २जीऐवजी थ्री जी सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे आता यापुढे तरी बीएसएनएलच्या ग्राहकांना चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

याठिकाणी टॉवर

सप्टेंबर महिन्यात चिपळूण तालुक्यातील बामणोली, दहीवली, भोम, लांजा तालुक्यातील खानवली, शिपोशी कोळकेवाडी, राजापूर तालुक्यातील सोलगाव, तुळसवडे आणि अणसुरे तर रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी, कासारी, नाखरे तसेच संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे अशा १२ ठिकाणी नवीन टॉवर सुरू करण्यात येत आहेत.

Web Title: Ratnagiri: 12 new towers from BSNL, work in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.