कोल्हापूर : ‘बीएसएनएल’ची सेवा कानाकोपऱ्यात पोहोचवा : शेट्टी, महाडिक यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 02:00 PM2018-09-14T14:00:48+5:302018-09-14T14:02:52+5:30

कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत ‘बीएसएनएल’ची सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील लोकांना दिलासा द्या, अशा सूचना खासदार राजू शेट्टी व खासदार धनंजय महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Kolhapur: BSNL should be given service: Shetty, Mahadik officials | कोल्हापूर : ‘बीएसएनएल’ची सेवा कानाकोपऱ्यात पोहोचवा : शेट्टी, महाडिक यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : ‘बीएसएनएल’ची सेवा कानाकोपऱ्यात पोहोचवा : शेट्टी, महाडिक यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘बीएसएनएल’ची सेवा कानाकोपऱ्यात पोहोचवा शेट्टी, महाडिक यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत ‘बीएसएनएल’ची सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील लोकांना दिलासा द्या, अशा सूचना खासदार राजू शेट्टी व खासदार धनंजय महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ताराबाई पार्क येथील टेलिफोन भवन येथे बीएसएनएल सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होेते. प्रमुख उपस्थिती सदस्य फत्तेसिंह सावंत, अमर पाटील, सागर शंभूशेटे, सचिन भांदिगरे, सूरजसिंह माने, वसंत पाटील, शिवाजीराव पाटील, नामदेव पाटील, संजय हेगडे, उपमहाप्रबंधक व्ही. जी. पाटील, एस. बी. सावंत, आदींची होती.

खा. शेट्टी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसह रेशन दुकानांसाठी मोबाईल सेवा द्यावी. त्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात यावे. तसेच डोंगराळ व दुर्गम भागात मोबाईलची सेवा देण्यासाठी कटिबद्ध रहावे.

खा. महाडिक म्हणाले, ‘बीएसएनएल’ने प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी ब्रॉडबॅँड जोडणी द्यावी. अंबाबाई मंदिर व ‘सीपीआर’ हॉस्पिटल येथे मोफत हॉटस्पॉट सेवा द्यावी. तसेच या ठिकाणी मोबाईल रेंजसाठी त्वरित सेवा द्यावी.

 कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील टेलिफोन भवन येथे बीएसएनएल सल्लागार समितीच्या बैठकीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी खा. धनंजय महाडिक, खा. राजू शेट्टी, फत्तेसिंह सावंत, अमर पाटील, आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: Kolhapur: BSNL should be given service: Shetty, Mahadik officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.