रत्नागिरीच्या शिक्षण विभागात खडखडाट, अधिकारीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:21 PM2019-06-05T12:21:00+5:302019-06-05T12:23:31+5:30

राज्यात शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाचा अक्षरश खेळखंडोबा सुरू आहे. राज्य शासनाने नुकत्याच (शिक्षण सेवा वर्ग १) शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये जिल्ह्यात असणाºया एकमेव शिक्षणाधिकाºयांची बदली करण्यात आली आहे.

Rakhnagiri's education department does not have rocks and officials | रत्नागिरीच्या शिक्षण विभागात खडखडाट, अधिकारीच नाहीत

रत्नागिरीच्या शिक्षण विभागात खडखडाट, अधिकारीच नाहीत

Next
ठळक मुद्देरत्नागिरीच्या शिक्षण विभागात खडखडाट, अधिकारीच नाहीत शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; देवीदास कुलाळ यांचीही बदली

रत्नागिरी / टेंभ्ये : राज्यात शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाचा अक्षरश खेळखंडोबा सुरू आहे. राज्य शासनाने नुकत्याच (शिक्षण सेवा वर्ग १) शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये जिल्ह्यात असणाऱ्या एकमेव शिक्षणाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

देविदास कुलाळ यांच्याकडे सध्या प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागांचा कार्यभार आहे. असे असताना नवीन आदेशानुसार कुलाळ यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या सहसचिवपदी बदली करण्यात आली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात एकही शिक्षणाधिकारी कार्यरत नाहीत. तसेच १३पैकी वर्ग दोनचे केवळ एक अधिकारी कार्यरत असून, ते देखील ३० जूनला सेवानिवृत्त होत आहेत.

दहावी व बारावीच्या निकालामध्ये गेली अनेक वर्षे राज्यात अव्वल असणाºया कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याकडे राज्य शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. राज्य शासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार रत्नागिरीमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक विभागाची जबाबदारी सांभाळणारे शिक्षणाधिकारी कुलाळ यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

यामुळे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच प्राथमिक शिक्षणाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत. सध्या जिल्ह्यात शिक्षण सेवा वर्ग दोनचे एकमेव पद कार्यरत आहे. लांजा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई हे ३० जूनला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये वर्ग दोनचे एकही पद कार्यरत राहणार नाही.
 

रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं अधिकाऱ्यांची कमतरता पाहायला मिळते. शिक्षण क्षेत्रात ती जास्त प्रमाणात जाणवत आहे. सर्व अधिकारी कार्यरत असणे अशी स्थिती रत्नागिरीमध्ये कधीही पाहायला मिळालेली नाही . शैक्षणिक धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी वर्ग महत्त्वाचा आहे. राज्य संघटनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची कमतरता शासनाच्या निदर्शनास आणून देणार येणार आहोत.
-भारत घुले,
उपाध्यक्ष, महाराष्ट्र माध्यमिक अध्यापक संघ
 

जिल्ह्यामध्ये एकही शिक्षणाधिकारी कार्यरत नसणे ही बाब अत्यंत दयनीय आहे. जिल्ह्यांमधील सर्व अधिकाºयांची पदे भरण्याबाबत जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करणार आहोत.
-विजय पाटील,
अध्यक्ष, मुख्याध्योपक संघ, रत्नागिरी

Web Title: Rakhnagiri's education department does not have rocks and officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.