अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून खून, खेड तालुका हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:00 PM2018-07-21T16:00:21+5:302018-07-21T16:02:54+5:30

खेड तालुक्यातील सुकीवली येथे एका चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची विदारक घटना गुरूवारी सायंकाळी उशिरा घडली.

Minor girl raped and murdered in Khed taluka, raped young woman | अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून खून, खेड तालुका हादरला

अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून खून, खेड तालुका हादरला

googlenewsNext
ठळक मुद्देअल्पवयीन युवतीवर बलात्कार करून खून, खेड तालुका हादरला नातेवाईक असलेला संशयित आरोपीला अटक

खेड : तालुक्यातील सुकीवली येथे एका चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची विदारक घटना गुरूवारी सायंकाळी उशिरा घडली. या प्रकरणी संशयित आरोपी सूर्यकांत चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले असून, तो दुर्दैवी पीडित मुलीचा नातेवाईक आहे, अशी माहिती खेडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी दिली.

सुकीवली येथील युवती गुरूवारी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास चव्हाणवाडी येथून आपल्या घरी जात होती. ती घरी आली नाही म्हणून तिच्या आईने तिची शोधाशोध केली. रात्री तिचे वडील घरी आल्यानंतर त्यांनीही आसपास चौकशी केली. परंतु, कुठेही तिचा शोध लागला नाही. तिच्या आईवडिलांनी तत्काळ खेड पोलिसांना याबाबत माहिती दिली.

या फिर्यादीनंतर पोलिसांनी तपासकामाला सुरूवात केली. पोलिसांनी काही ग्रामस्थांकडून माहिती घेतली. त्यावेळी काही ग्रामस्थांकडून सूर्यकांत नवनाथ चव्हाण (२९) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी पहाटे अडीच -तीन वाजण्याच्या सुमारला त्याला ताब्यात घेतले. परंतु त्याने काहीही कबुल करण्यास नकार दिला.

पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बोलण्यास सुरूवात केली. सायंकाळी ती घरी जात असताना त्याने त्या पीडित मुलीला आजोबा घरी बोलवत आहेत, असे सांगून आपल्या घरी नेले. तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केला, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपले हे कृत्य उघड होऊ नये यासाठी त्याने तिला घराच्या मागील बाजूस असलेल्या संडासच्या टाकीत टाकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी नऊ वाजण्याच्या सुमाराला त्याला घटनास्थळावर नेऊन पंचनामा केला. त्यानंतर युवतीचा मृतदेह शौचालयाच्या टाकीतून बाहेर काढण्यात आला.

तो विच्छेदनासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सूर्यकांत चव्हाण याला खेड येथील न्यायालयात हजर केले असता त्याला दिनांक २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Minor girl raped and murdered in Khed taluka, raped young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.