गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी दाखल, पेटीचा दर काय...जाणून घ्या

By मेहरून नाकाडे | Published: April 9, 2024 02:03 PM2024-04-09T14:03:30+5:302024-04-09T14:04:22+5:30

आंबा पेट्यांची व्यापाऱ्यांनी विधीवत पूजा केल्यानंतरच लिलाव

Mangoes entered for sale in Vashi market on the occasion of Gudi Padwa | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी दाखल, पेटीचा दर काय...जाणून घ्या

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी दाखल, पेटीचा दर काय...जाणून घ्या

रत्नागिरी : दरवर्षी गुढीपाडव्याला हापूस आंबा विक्रीसाठी बाजारात दाखल होतो. यावर्षीही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारपेठेतआंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे. व्यापाऱ्यांनी आंबा पेट्यांची विधीवत पूजा करून त्याचा लिलाव केला.

गुढीपाडव्याचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. वास्तविक जानेवारीपासून आंबा वाशी बाजारपेठेमध्ये दाखल झाला आहे. मात्र त्याचे प्रमाण किरकोळ होतो. परंतु मार्चपासून आवक वाढली आहे. आंबा जसजसा तयार होईल तसा काढून विक्रीसाठी बाजारपेठेत पाठविला जात असला तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला आपला बाजारात विक्रीसाठी पाठवण्यासाठी बागायतदारही इच्छूक असतात.

त्यानुसार सोमवारी (दि.८) काढलेला आंबा मंगळवारी (दि.९) बाजारात पाठविण्यात आला होता. वाशी बाजारपेठेत मंगळवारी ५५ हजार आंबा पेट्या विक्रीला आल्या होत्या. आलेल्या आंबा पेट्यांची व्यापाऱ्यांनी विधीवत पूजा केल्यानंतरच लिलाव केला. १५०० ते ३५०० रूपये पेटीला दर देण्यात आला.

Web Title: Mangoes entered for sale in Vashi market on the occasion of Gudi Padwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.