Maharashtra Bandh : रत्नागिरी जिल्ह्यात संमिश्र बंद, चिपळुणात मोठा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:47 PM2018-08-09T13:47:36+5:302018-08-09T13:50:17+5:30

सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. चिपळूण शहर कडकडीत बंद असून, इतर सर्व तालुक्यांमध्ये दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. एस्. टी. वाहतूक मात्र जिल्ह्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Maharashtra Bandh Blocked in Ratnagiri district, big rally in Chiplun | Maharashtra Bandh : रत्नागिरी जिल्ह्यात संमिश्र बंद, चिपळुणात मोठा मोर्चा

Maharashtra Bandh : रत्नागिरी जिल्ह्यात संमिश्र बंद, चिपळुणात मोठा मोर्चा

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात संमिश्र बंदचिपळुणात मोठा मोर्चा

रत्नागिरी : सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. चिपळूण शहर कडकडीत बंद असून, इतर सर्व तालुक्यांमध्ये दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. एस्. टी. वाहतूक मात्र जिल्ह्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.

आरक्षण तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज गुरूवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत महाराष्ट्र बंद करण्याची हाक दिली. या आंदोलनात रत्नागिरी जिल्हाही सहभागी झाला आहे. ३ आॅगस्टच्या जिल्हा बंद आंदोलनाला व्यापारी संघटनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे यावेळी व्यापारी संघटनेने हा बंद ऐच्छिक असल्याची भूमिका घेतली. त्यामुळे बहुतांश ठिकाणी दुकानांचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत.

चिपळूणमध्ये मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. चिपळूणमध्ये सकाळच्या सत्रात दणदणीत मोर्चाही काढण्यात आला. पुरूषांप्रमाणेच त्यात महिला, युवतींचे प्रमाण अधिक होते. चिपळूणवगळता इतरत्र ठिय्या आंदोलन केले जात आहे. रत्नागिरीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर इतर ठिकाणी तहसील, प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे.

दापोलीत बंद नाही

दापोली कृषी विद्यापीठातील ३0 कर्मचारी अपघातात दगावले. आज ९ आॅगस्ट रोजी त्यांचे दिवसकार्य असल्याने त्या सर्व घरांमध्ये नातेवाईक येणार हे लक्षात घेऊन त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आजच्या बंदमध्ये दापोली सहभागी होणार नाही, असा निर्णय आधीच सकल मराठा समाजाच्या दापोलीतील पदाधिकाऱ्यांनी घेतला होता.

Web Title: Maharashtra Bandh Blocked in Ratnagiri district, big rally in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.