गुहागर - रानवी गावातील घरात शिरला बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 04:40 PM2018-07-10T16:40:37+5:302018-07-10T16:42:35+5:30

गुहागर तालुक्यातील रानवी गावातील रमेश बारगोडे यांच्या घरातील पडवी बिबट्या बसलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा बिबट्या काल (सोमवारी) रात्री शिरल्याचा अंदाज असून, तो जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

Guhagar - Ranvi entered the house of the house Leopard | गुहागर - रानवी गावातील घरात शिरला बिबट्या

गुहागर - रानवी गावातील घरात शिरला बिबट्या

googlenewsNext
ठळक मुद्देगुहागर - रानवी गावातील घरात शिरला बिबट्यापकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू

गुहागर : तालुक्यातील रानवी गावातील रमेश बारगोडे यांच्या घरातील पडवी बिबट्या बसलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा बिबट्या काल (सोमवारी) रात्री शिरल्याचा अंदाज असून, तो जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

रानवी गावातील रमेश बारगोडे यांना पहाटे बिबट्या ओरडत असल्याचा आवाज ऐकू आला. घराशेजारीच बिबट्याचा आवाज येत असल्याने ते तातडीने उठले आणि आवाजाच्या दिशेने गेले. घराच्या पडवीतून बिबट्याचा आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच ते त्या दिशेने गेले. बॅटरीच्या उजेडावर त्यांनी पाहिले असता बिबट्या तेथे बसलेला दिसला. त्यांनी तातडीने घरचा दरवाजा बंद केला व पोलीस पाटील यांना कळविले.

पोलीस पाटील यांनी तत्काळ याबाबतची माहिती वन विभाग व पोलिसांना दिली. दोन्ही विभाग घटनास्थळी दाखल झाले असून, बिबट्या पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. मात्र, पडवीत बसलेल्या बिबट्याला जागेवरून हालता येत नसल्याने त्याच्या पायाला दुखापात झाली असण्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे.

Web Title: Guhagar - Ranvi entered the house of the house Leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.