..तर महाराष्ट्र काय पेटवणार; प्रमोद जठारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 01:37 PM2023-05-06T13:37:48+5:302023-05-06T13:38:18+5:30

आमदार साळवींवर दबाव टाकून भुमिका बदलायला लावली

Former MLA Pramod Jathar criticizes Uddhav Thackeray over refinery project | ..तर महाराष्ट्र काय पेटवणार; प्रमोद जठारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

..तर महाराष्ट्र काय पेटवणार; प्रमोद जठारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

googlenewsNext

विनोद पवार

राजापूर : बारसु नको तर आम्हाला नाणार द्या... तुम्हाला बारसु नको असेल तर आमच्याकडे नाणार आहे, नाणार मध्ये १० हजार एकर जमिनीची सम्मतीपत्र आहेत. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातून बाहेर जाणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले.

दरम्यानच, आज रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांची संवाद साधताना आक्रमक पवित्रा घेत जर रिफायनरी रद्द झाली नाही तर आम्ही महाराष्ट्र पेटवू असा इशारा दिला. ठाकरेंच्या या इशाऱ्याचा प्रमोद जठार यांनी बोचऱ्या शब्दात समाचार घेतला. तुम्ही साधी लोकांची चुल पेटवू शकत नाही तर महाराष्ट्र काय पेटवणार ? अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना अडीच वेळाही मंत्रालयात गेला नाहीत. मग तुम्ही महाराष्ट्र काय पेटवणार ? असा प्रश्न देखील केला. 

आमदार साळवींवर दबाव टाकून भुमिका बदलायला लावली

जोपर्यंत इथे येवून उद्धव ठाकरे आम्हा प्रकल्प समर्थकांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत तो पर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. आम्ही प्रकल्पसमर्थक या भारताचे नागरिक नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आमदार राजन साळवी यांनाही या प्रकल्पाचे महत्व समजले आहे. मात्र त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना भुमिका बदलायला लावली असल्याचेही जठार म्हणाले.

हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू

बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचं रत्नागिरीत आगमन झाल्यापासून ठिकठिकाणी जोरदार स्वागत झालं. तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. दरम्यान, यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे.

लोकांवर जबरदस्ती करून प्रकल्प करा असं मी म्हटलं नव्हतं

मी प्रकल्पासाठी पत्र लिहिलं होतं. मात्र लोकांवर जबरदस्ती करून प्रकल्प करा असं मी म्हटलं नव्हतं. हुकूमशाहीच्या माध्यमातून हा प्रकल्प लादू नका. राज्य सरकारने हुकूमशाही करून हा रिफायनरी प्रकल्प येथे लादण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही महाराष्ट्र पेटवू. आज मी इथे येऊन उभा आहे. आता जे या प्रकल्पाचं समर्थन करत आहेत. त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त बाजूला ठेवून समोर या आणि रिफायनरीचं समर्थन करून दाखवावं, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं.

Web Title: Former MLA Pramod Jathar criticizes Uddhav Thackeray over refinery project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.