आचारसंहितेचा विमान उड्डानाला लाल दिवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:32 AM2019-04-16T11:32:18+5:302019-04-16T11:34:09+5:30

लोकसभा निवडणुकीमुळे रत्नागिरीतील विमानतळाचे काम रखडले आहे. विमान कंपनी सेवा देण्यास तयार असतानाही निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रत्नागिरीतील विमान

Flight Code of Flight | आचारसंहितेचा विमान उड्डानाला लाल दिवा

आचारसंहितेचा विमान उड्डानाला लाल दिवा

Next
ठळक मुद्देही योजना पूर्ण होण्यासाठी आणखीन विलंब होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीमुळे रत्नागिरीतील विमानतळाचे काम रखडले आहे. विमान कंपनी सेवा देण्यास तयार असतानाही निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रत्नागिरीतील विमान उड्डानाला ‘ब्रेक’ लागला आहे.

सर्वसामान्यांना विमान प्रवास करता यावा, यासाठी केंद्र सरकारने  ‘उडान’ योजनेद्वारे बंद पडलेले विमानतळ व धावपट्ट्यांचे काम करून तेथून विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पहिल्या तीन टप्प्यात राज्यातील नाशिक, नांदेड, कोल्हापूर व जळगाव या विमानतळांवरून सामान्यांना परवडेल, अशी सेवा सुरू झाली आहे. त्यानंतर ‘उडान ३.१’ची घोषणा करण्यात आली होती. निवडणुकीच्या तोंडावरच ही घोषणा करण्यात आल्याने या योजनेला आचारसंहितेचा फटका बसला आहे.

‘उडान ३.१’मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन शहरांना मुंबईशी जोडण्यासाठी सरकारी अलायन्स इंडिया या कंपनीने तयारी दर्शविली होती. कंपनीने ही तयारी दर्शवली असली तरी आचारसंहितेमुळे हे काम रखडले आहे. मात्र, पुण्याहून कोकणात सेवा देण्यासाठी कोणतीच कंपनी तयार नसल्याचे दिसत आहे. रत्नागिरी विमानतळ सध्या तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. पण आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे काम थांबले आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली. ‘उडान’च्या नियमानुसार कोकणची विमानसेवा त्यानंतर सहा महिन्यात अर्थात ८ सप्टेंबरपूर्वी सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, आता हे काम आचारसंहिता संपल्यानंतरच सुरू होणार आहे.

सिंधुदुर्ग विमानतळ तयार

सिंधुदुर्गचा विमानतळ सध्या तयार आहे.  मात्र, रत्नागिरी विमानतळाचा विकास साधण्यासाठी आधीच एक महिना उलटून गेला आहे. निवडणूक संपण्यास आणखी किमान दीड महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे ही योजना सद्यस्थितीत रखडलेली आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखीन विलंब होण्याची शक्यता आहे.

Web Title: Flight Code of Flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.