देवरूख : नगर पंचायत : समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न, वाहनचालकांची मोठी गैरसोय -वाहन पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 02:05 PM2018-09-18T14:05:47+5:302018-09-18T14:08:40+5:30

देवरूख शहरामध्ये होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी नगर पंचायतीकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना काहीअंशी यशदेखील येत आहे. मात्र, शहरामध्ये विविध कामांकरिता येणाºया नागरिकांच्या वाहनांसाठी

Deorukh: Nagar Panchayat: Attempts to solve the problem, big disadvantages of drivers- Parking parking issue on the anvil | देवरूख : नगर पंचायत : समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न, वाहनचालकांची मोठी गैरसोय -वाहन पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

देवरूख : नगर पंचायत : समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न, वाहनचालकांची मोठी गैरसोय -वाहन पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

googlenewsNext

देवरूख : देवरूख शहरामध्ये होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी नगर पंचायतीकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना काहीअंशी यशदेखील येत आहे. मात्र, शहरामध्ये विविध कामांकरिता येणाºया नागरिकांच्या वाहनांसाठी हक्काची पार्किंग सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. देवरूख नगर पंचायतीने पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे. 

 देवरूख नगर पंचायत, पोलीस प्रशासनाच्यावतीने शहरात वाहतूककोंडी होऊ नये याकरिता उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये शहरातील व्यापाºयांची बैठक घेऊन त्यांना योग्य सूचना देणे, बैठकीनंतर त्यांना रितसर नोटीस देणे, नोटीस दिल्यानंतर मार्गावर असलेले अतिक्रमण न हटवल्यास कारवाईचे संकेतही देण्यात आले होते. तसेच कारवाईचे संकेत देताना पोलीस प्रशासन, तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी व नगर पंचायतीचे मुख्याधिकाºयांनी बाजारपेठेची प्रत्यक्ष पाहणी करून व्यापाºयांना योग्य त्या सूचनादेखील केल्या होत्या. 

त्यानंतर शहरातील व्यापाºयांनी या सूचनांची अंमलबजावणी करताना गटारावर असणारे दुकानांचे नामफलक हटवून मार्ग मोकळा केला  होता. मात्र, तालुक्याच्या ग्रामीण भागातून देवरुख शहरात विविध कामांसाठी वाहने घेऊन येणाºया नागरिकांना आपली वाहने उभे करून ठेवण्यासाठी हक्काची जागा नसल्याचे चित्र सध्या आहे. 
देवरूख शहर हे तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असल्याने याठिकाणी पदवी महाविद्यालये, दवाखाने, विविध शासकीय कार्यालये, विविध राष्टयीकृत बँका याचबरोबरच मोठी बाजारपेठ असल्याने तालुक्याच्या कानाकोपºयातून देवरूखमध्ये वाहने घेऊन येणाºयांची संख्या लक्षणीय आहे.

वाहन घेऊन आलेल्यांनी आपली वाहने कोठे उभी करायची? असा प्रश्न त्यांना पडतो. यावेळी दुकानांसमोर वाहने उभी केल्यास वाहतूककोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगसाठी हक्काची जागा मिळणे आवश्यक आहे. 
यापूर्वी देवरूख बसस्थानकाबाहेर किमान १००पेक्षा अधिक दुचाक ी पार्क होत होत्या. मात्र, गणेशोत्सव काळात वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून देवरूख आगाराच्या जागेत पार्किंग करण्याला सध्या मनाई करण्यात आली आहे.

आगाराची ही जागा असल्याने आगाराने घेतलेला हा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. मात्र, याठिकाणी उभ्या केल्या जाणाºया दुचाकींसाठी शहरात पर्यायी जागा उपलब्ध झालेली नाही. याकडे देवरूख नगर पंचायतीचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नगर पंचायतीने पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून दिल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. गेली कित्येक वर्ष शहरात पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून देणार असल्याचे नगर पंचायतीकडून सांगण्यात आले होते. मात्र, ती केवळ घोषणाच ठरली आहे. त्यामुळे देवरूख शहरात पार्किंगचा प्रश्न अजूनही जैसे थेच आहे.

Web Title: Deorukh: Nagar Panchayat: Attempts to solve the problem, big disadvantages of drivers- Parking parking issue on the anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.