उरण विधानसभा मतदारसंघात १२०० अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 05:51 PM2024-04-13T17:51:37+5:302024-04-13T17:52:01+5:30

शिबिराप्रसंगी १२०० मतदान अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

Training camp for 1200 officers employees in Uran Assembly Constituency | उरण विधानसभा मतदारसंघात १२०० अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर 

उरण विधानसभा मतदारसंघात १२०० अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर 

मधुकर ठाकूर, उरण : मावळ लोकसभा मतदारसंघातील १९० उरण विधानसभा मतदारसंघात कर्मचारी वअधिकाऱ्यांसाठी मतदान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी दिपक सिंघला यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिराप्रसंगी १२०० मतदान अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

 मावळ लोकसभेची निवडणूक १३ मे रोजी जाहीर झाली आहे.यामुळे सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या लोकसभा मतदारसंघात मतदारसंघात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.या लोकसभा मतदारसंघात १९० -उरण हा विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.या उरण विधानसभा  मतदारसंघात एकूण ३४४ मतदान केंद्र आहेत.या ३४४ मतदान केंद्रात १२०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत.

या नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारी  (१२) मतदान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.उरण तालुक्यातील जासई येथील दिवंगत दि.बा.पाटील सभागृहात मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी दिपक सिंघला यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मतदान प्रशिक्षण शिबिरात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार,उरण तहसीलदार डॉ. उध्दव कदम, पनवेल अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगोले, अर्चना प्रधान आदी अधिकारी उपस्थित होते.
 
या मतदान प्रशिक्षण शिबिरात उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक अधिकारी दिपक सिंघला यांनी मार्गदर्शन केले .या मार्गदर्शनात त्यांनी मतदान प्रक्रियेत कोणती काळजी घ्यावी,कशा पद्धतीने हाताळणी करावी याची सविस्तर माहिती कर्मचारी व अधिकाऱ्यांना करून दिली.तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंका कुशंकांचेही त्यांनी निराकरण केले.

Web Title: Training camp for 1200 officers employees in Uran Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड