अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी

By निखिल म्हात्रे | Published: April 14, 2024 08:24 PM2024-04-14T20:24:45+5:302024-04-14T20:25:08+5:30

लोकमत न्युज नेटवर्क  अलिबाग - अलिबागमध्ये हजारो पर्यटक शनिवार, रविवारी दाखल झाले होते. पर्यटनाचा आनंद लुटून  रविवारी दुपारनंतर  माघारी ...

Stormy rush of tourists in Alibaug Agar | अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी

अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी

लोकमत न्युज नेटवर्क 
अलिबाग - अलिबागमध्ये हजारो पर्यटक शनिवार, रविवारी दाखल झाले होते. पर्यटनाचा आनंद लुटून  रविवारी दुपारनंतर  माघारी जाताना पर्यटकांचे मोठे हाल पाहायला मिळाले. अलिबाग एस टी आगारात बसला तुफान गर्दी पर्यटक प्रवाशाची झाली होती. बसच्या फेऱ्या कमी पडत असल्याने पर्यटकांना दोन दोन तास बसची वाट पाहत ताटकळत राहावे लागले होते. त्यात अलिबाग पनवेल विना वाहक एस टी सेवेसाठी मोठी लांब लाईन लावावी लागत होती. पर्यटकांच्या गर्दीच्या दृष्टीने एस टी विभागाचे नियोजन ठेपाळले होते. 

या आठवड्यात सलग सुट्ट्या असल्याने तसेच परीक्षांचा हंगाम संपून शाळांना सुट्ट्या लागल्याने अलिबागमध्ये पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. अनेक पर्यटक हे जलवाहतूक तसेच एस टी बसचा प्रवास करून अलिबागेत दाखल झाले होते. दोन तीन दिवसांसाठी आलेल्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होते. अलिबागचे समुद्रकिनारे हे पर्यटकांनी बहरून गेले होते. 

 पर्यटक पुन्हा मुंबई, ठाणे कडे माघारी जाण्यास निघाले. बसने आलेले पर्यटक हे अलिबाग आगारात दाखल झाले. मुंबईकडे जाणारी परतीची बस पकडण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी सायंकाळच्या सुमारास आगारात झाली होती. वीना वाहक पनवेल बसला आगारात तुफान गर्दी झाली होती. तर इतर ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरही पर्यटक बसची वाट पाहत होते. अलिबाग आगारात सायंकाळच्या सुमारास हजारो पर्यटक प्रवासी हे बसची वाट पाहत ताटकळत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

जलवाहतूकिवरही प्रवाशांची गर्दी
मांडवा येथून जलवाहतूकीने गेटवेला जाण्यासाठी प्रवशांची गर्दी झाली होती. दुपारी नंतर ही गर्दी वाढल्याने जलवाहतूकिवर परिणाम दिसला. जलवाहतूक बोटी व्यवसायिकही प्रवाशांची गैरसोय सोडविण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र प्रवासी संख्या अधिक असल्याने त्याचेही वेळापत्रक कोलमडले होते

Web Title: Stormy rush of tourists in Alibaug Agar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग