श्रीवर्धन सर्वा आदगाव रस्त्यावर दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 02:46 AM2018-06-23T02:46:53+5:302018-06-23T02:46:55+5:30

दोन दिवस पावसाने थैमान घातले असून डोंगराळ भागात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली.

Shrigordhan Sarvardhana on the main road of Adgaon collapsed | श्रीवर्धन सर्वा आदगाव रस्त्यावर दरड कोसळली

श्रीवर्धन सर्वा आदगाव रस्त्यावर दरड कोसळली

googlenewsNext

श्रीवर्धन : तालुक्यात दोन दिवस पावसाने थैमान घातले असून डोंगराळ भागात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सर्वा आदगाव रस्त्यावर सर्वा गावाच्या हद्दीत मध्यरात्री दरड कोसळली. त्यामुळे सकाळ ते दुपारपर्यंत रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले. स्थानिक लोकांनी माती हटवण्याचा प्रयत्न केला, परंतु मातीसोबत एक मोठे झाड रस्त्यावर आडवे झाले होते.
श्रीवर्धन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाºयांनी सकाळी घटनास्थळी धाव घेऊन मातीचा भराव काढण्यात सुरुवात केली. तसेच रस्त्यावर आडवे झालेले झाड हलविण्यात आले. नानवेल, सर्वा, आदगाव, वेळास या गावांची वाहतूक व्यवस्था विशेष करून एसटीवर अवलंबून आहे. त्यामुळे दिवसभर प्रवासी व विद्यार्थी यांचे अतोनात हाल झाले.
सर्वा, वेळास येथील विद्यार्थी आदगाव शाळेत शिकतात. एसटी हे मुख्य साधन असल्याने शुक्रवारी पाचवी ते दहावी इयत्तेत शिकणाºया विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. तसेच सर्वा व नानवेल येथील हिंदी व मराठी माध्यमांचे विद्यार्थी दिघी शाळेत जातात त्यांना सुद्धा वाहतूक व्यवस्था न झाल्यामुळे शाळेत जाता आले नाही. एसटीच्या फेºया बोर्ली ते आदगावपर्र्यंत सोडण्यात आल्या. सर्वा रहिवासी व प्रवासी यांना दरड कोसळण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात झाला.
>दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत होती. गुरुवारी मध्यरात्री सर्वा आदगाव रस्त्यावर दरड कोसळली होती. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यास कळवण्यात आले असून अधिकारी व कर्मचाºयांनी घटनास्थळी भेट दिली. सायंकाळ पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
- सुभाष कदम, पोलीस पाटील, सर्वा आदगाव

Web Title: Shrigordhan Sarvardhana on the main road of Adgaon collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.