मुरुडमध्ये बोटी समुद्रात खेचण्याच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:28 AM2018-07-23T03:28:31+5:302018-07-23T03:29:09+5:30

तालुक्यात कोळी बांधवांकडून बोटींची डागडुजी, रंगरंगोटीसाठी लगबग

In Murud, the work of pulling the sea into the sea | मुरुडमध्ये बोटी समुद्रात खेचण्याच्या कामांना वेग

मुरुडमध्ये बोटी समुद्रात खेचण्याच्या कामांना वेग

Next

- संजय करडे

मुरुड जंजिरा : तालुक्यात मासेमारी करणाऱ्या मोठ्या बोटींची संख्या जवळपास ६५० इतकी आहे. याशिवाय लहान बोटीही तितक्यास संख्येत आहेत. १ जून ते ३१ जुलै मासेमारी बंदी असल्याने सर्व बोटी किनाºयाला शाकारण्यात आल्या होत्या. मासेमारीबंदीच्या या काळात सहा सिलिंडर अशा मोठ्या बोटींच्या दुरु स्तीची कामे करण्यात आली होती. आता संपूर्ण तालुक्यातून दुरु स्तीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मोठ्या बोटी समुद्रात पुन्हा उतरवण्याची लगबग दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातील पावसाळ्याच्या दोन महिन्यांत कोळी बांधवांकडून बोटींची डागडुजी, रंगरंगोटी करण्यात येते. मोठ्या बोटींवर किमान २२ लोक काम करीत असतात. कोळी समाज सध्या मासेमारी सुरू होण्याची वाट पाहत असून त्यासाठी बोटी किनाºयावर आणण्यात येत आहेत.
मुरुड शहरातील कोळीवाडा परिसरातील कमळावंती ही सहा सिलिंडरची बोट नुकतीच पाण्यात खेचण्यात आली आहे. ही बोट खूप मोठी असल्याने ट्रॅक्टर व मनुष्यबळाच्या आधारे बोट पाण्यात खेचण्यात आली आहे.

Web Title: In Murud, the work of pulling the sea into the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.