नेरळ-माथेरान मार्गात अडचणींचा डोंगर, सरळ चढ, तीव्र वळणांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 06:08 AM2017-12-01T06:08:40+5:302017-12-01T06:09:00+5:30

माथेरानच्या अर्थव्यवस्थेत मिनी ट्रेनची भूमिका महत्त्वाची आहे. अमन लॉज ते माथेरान मार्गावर मिनी ट्रेन सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांची पावले माथेरानकडे वळत आहेत. सध्या या मार्गावर सुरक्षेसंदर्भातील सर्व कामे झाली आहेत.

 Mountaineering, straight slopes, sharp turn of obstacles in the direction of the Nerald-Matheran | नेरळ-माथेरान मार्गात अडचणींचा डोंगर, सरळ चढ, तीव्र वळणांचा अडसर

नेरळ-माथेरान मार्गात अडचणींचा डोंगर, सरळ चढ, तीव्र वळणांचा अडसर

Next

मुंबई : माथेरानच्या अर्थव्यवस्थेत मिनी ट्रेनची भूमिका महत्त्वाची आहे. अमन लॉज ते माथेरान मार्गावर मिनी ट्रेन सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांची पावले माथेरानकडे वळत आहेत. सध्या या मार्गावर सुरक्षेसंदर्भातील सर्व कामे झाली आहेत. नेरळ ते अमन लॉज या मार्गावरील कामेही वेगाने सुरू आहेत. तरीदेखील या मार्गावर रेल्वेसमोर तीव्र वळणे, सरळ चढ अशा अनेक अडचणींचा डोंगर उभा आहे. यावर मात करत नेरळ-माथेरान ही थेट मिनी ट्रेन सेवा मार्च २०१८मध्ये सुरू होण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने अमन लॉज ते माथेरान मार्गावर प्रवासी सुरक्षितता लक्षात घेत विविध कामे केली आहेत. त्यानंतर या मार्गावर मिनी ट्रेन सुरू झाली आहे. आता नेरळ ते अमन लॉज मार्गाची कामे सुरू आहेत. नेरळ - माथेरान मार्गावर तीव्र वळणे आहेत. त्याचबरोबर १०पेक्षा जास्त ठिकाणी सरळ चढ आहेत. रेल्वे परिमाणात हे रूळ बसत नाहीत. त्यामुळे रेल्वे रूळ, स्लीपर्स बदलण्याची गरज आहे. अशा अनंत अडचणींचा डोंगर पार करत ही सेवा सुरू करण्याचे आव्हान आहे. मात्र हे आव्हान पेलण्याचे आव्हान प्रशासनाने घेतले आहे.
नेरळ - माथेरान मार्गावरील कामासाठी सुमारे १२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठीचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार या मार्गावरील कामाचे कंत्राटदेखील देण्यात आले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे
मुख्य सुरक्षा आयुक्त शुभ्रांशु यांनी
दिली आहे.

वैशिष्ट्ये
प्रत्येक चाकाला एक ब्रेक
पूर्वी दोन चाकांना मिळून एक सिलिंडर होते
इंजीनमध्ये वेग नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित

नेरळ-माथेरान मार्गावर २२१ वळणे

वळण संख्या अंतर
४० अंशाखालील १२० ८.१० किमी
४०-६० अंश यामधील ६१ ४.१५ किमी
६० अंशावरील ४० ३.१५

नेरळ - माथेरान या मार्गावर अनेक ठिकाणी तीव्र वळणे आहेत. त्याचबरोबर १०पेक्षा जास्त ठिकाणी सरळ चढ आहेत.

दोन महिन्यांत ३ इंजीन
माथेरानसाठी ५ इंजिनांचे काम परळ वर्कशॉपमध्ये सुरू आहे. दोन महिन्यांत ३ इंजिने माथेरानमध्ये दाखल होणार आहेत. सद्य:स्थितीत तीनशेऐवजी सहाशे हॉर्स पॉवरची दोन इंजिने जोडण्यात आली आहेत. तर आधुनिक एअर ब्रेकदेखील कार्यान्वित करण्यात आले आहेत.

Web Title:  Mountaineering, straight slopes, sharp turn of obstacles in the direction of the Nerald-Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.