‘मिशन कायापालट’; आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठीआरोग्य केंद्रनिहाय कृती आराखडा तयार करा -  जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 03:40 AM2017-12-17T03:40:54+5:302017-12-17T03:41:01+5:30

जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या बळकटीकरणाकरिता ‘मिशन कायापालट’ राबविण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सज्ज व्हावे. प्रत्येक आरोग्य केंद्र हे माझा दवाखाना या विचाराने सुसज्ज करावे.

'Mission Transformation'; Preparation of health plan for strengthening health services - District Collector | ‘मिशन कायापालट’; आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठीआरोग्य केंद्रनिहाय कृती आराखडा तयार करा -  जिल्हाधिकारी 

‘मिशन कायापालट’; आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठीआरोग्य केंद्रनिहाय कृती आराखडा तयार करा -  जिल्हाधिकारी 

Next

- जयंत धुळप

अलिबाग :  जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या बळकटीकरणाकरिता ‘मिशन कायापालट’ राबविण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सज्ज व्हावे. प्रत्येक आरोग्य केंद्र हे माझा दवाखाना या विचाराने सुसज्ज करावे. त्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाºयांनी आपापल्या आरोग्य केंद्रनिहाय कृती आराखडा तयार करावा, असे सुस्पष्ट निर्देश ‘मिशन कायापालट’ योजनेचे प्रणेते रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात मिशन कायापालट राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेची पूर्वतयारी बैठक शुक्र वारी माळरान कृषी पर्यटन केंद्र, राजमाळ येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी एआरटी डॉ. पांडुरंग शिंदे, जिल्हा कार्यक्र म व्यवस्थापक डॉ. कोकरे, तालुका आरोग्य अधिकारी मुरु ड डॉ. चंद्रकांत जगताप, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक नवनाथ लबडे, जिल्हा सहायक लेखा रवींद्र कदम, जिल्हा सहायक एम अ‍ॅण्ड ई रश्मी सुंकले, जिल्हा सहायक कार्यक्र म अधिकारी संपदा मळेकर, आधार ट्रस्टच्या प्रतिनिधी जागृती गुंजाळ, प्रेम खंडागळे हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी तेथे कायापालट अभियान राबवून कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्यसेवेचे बळकटीकरण केले होते. त्यानंतर हे अभियान केंद्रात ‘कायाकल्प’ म्हणून आणत राज्यात ‘कायापालट’ म्हणून स्वीकारण्यात आले. यासंदर्भात राज्य शासनाने दि. ३ सप्टेंबर २०१४ रोजी शासन निर्णय जारी करून या अभियानाची अंमलबजावणी राज्यात लागू केली आहे. हे अभियान प्रत्यक्ष राबविलेले कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी व विद्यमान आरोग्य उपसंचालक डॉ. रामजी अडकेकर, कोल्हापूरच्या जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, भेडसगाव-शाहुवाडी जि. कोल्हापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माळी हे उपस्थित वैद्यकीय यंत्रणेस मार्गदर्शनासाठी आले होते.

३१ डिसेंबरपर्यंत सुविधांचे मूल्यमापन करून कृती आराखडा तयार करा
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, उपचारानंतर बºया झालेल्या रुग्णाच्या दृष्टीने डॉक्टर हा देव असतो. आपण ज्या गावात सेवा देत असतो त्या गावाशी, गावातील लोकांशी डॉक्टरांचे एक नाते तयार होते. त्यामुळे येणारा प्रत्येक रु ग्ण हा समाधानाने घरी परत जावा, हा हेतू ठेवून काम करणे हे आपले सेवा देताना उद्दिष्ट असावे.
केवळ सरकारी दवाखाना नव्हे तर आपला दवाखाना ही भावना मनात रु जवून काम करावे. शासनाने राज्यात लागू केलेले हे कायापालट अभियान आपल्या जिल्ह्यात राबवून आरोग्य सेवा उत्तम करण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणांनी सज्ज व्हावे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रनिहाय येत्या ३१ डिसेंबरपर्यंत सुविधांचे मूल्यमापन करून कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.
कोल्हापूरच्या कायापालट अभियानातील सहभाग्यांनी अनुभव कथन केले. या अभियानाच्या तेथील अंमलबजावणीच्या यश कथा उपस्थितांसमोर मांडल्या. कार्यक्र माचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन साळुंखे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. आर. के. कोरे यांनी केले.

कायापालट अंतर्गत अपेक्षित बाबी
ग्रामीण रु ग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा सर्व ठिकाणी इमारतींची अंतर्गत व बाह्य स्वच्छता, रंगरंगोटी. रु ग्णसेवेसाठी मार्गदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब व त्याचे तंतोतंत पालन, रु ग्णालयांपर्यंत दिशादर्शक फलक, लांबून रु ग्णालय ओळखू यावे, यासाठी दर्शनी कमान, परिसर स्वच्छता, सुसज्ज औषधालये, बाह्य रु ग्णांसाठी प्रतीक्षालये, पिण्याचे शुद्ध पाणी, उद्यान सुविधा, रु ग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी सौजन्यपूर्ण वर्तन, आवश्यक उपकरणांची उपलब्धता, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांचे सहकार्य मिळविणे, उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व निधी (वस्तू स्वरूपात) उपलब्ध करून आवश्यक बाबींची पूर्तता करणे.

- जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत दोन सिटी स्कॅन मशिन्स आहेत. त्यातील एक अलिबाग जिल्हा रु ग्णालयात व एक माणगाव येथे आहे. मात्र, माणगाव येथील यंत्र बंद आहे. सर्व ग्रामीण रु ग्णालयांत एक्स-रे मशिन्स आहेत. अलिबाग व महाड येथे सोनोग्राफी यंत्रेही आहेत.
जिल्हा रु ग्णालय अलिबाग येथे रक्तपेढी असून, महाड, माणगाव येथे रक्त साठवणूक यंत्रणा आहे. कर्जत, उरण आणि पेण येथे रक्तसाठवणूक यंत्रणा उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. जिल्ह्यात शासनाने खासगी यंत्रणेमार्फत रक्ततपासणी सुविधा सर्व शासकीय रु ग्णालयांत उपलब्ध करून दिली आहे.
याशिवाय जिल्ह्यात आपत्तीच्या रु ग्णसेवेसाठी १०८ ही शासनाची विनामूल्य रु ग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. अशा २२ रु ग्णवाहिका जिल्ह्यात कार्यरत आहेत.

Web Title: 'Mission Transformation'; Preparation of health plan for strengthening health services - District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड