दुर्गम महागांवमधील अंधाऱ्या झोपडीतील महिला वीजबचतीच्या संदेशासह शहरी भागांत पुरवणार एलईडी बल्ब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 05:07 PM2018-03-30T17:07:11+5:302018-03-30T17:07:11+5:30

ग्रामीण गावातील महिलांना आर्थिक व सामाजिक अशा अनेक मर्यादा असतात, मात्र या मर्यादांवर  आधूनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन आपण मात करु शकतो हे, सुधागड या दूर्गम डोंगराळ तालुक्यांतील महागाव मधील स्त्नीशक्ती  महिला बचतगटाच्या महिलांनी चक्क विज बचत करणाऱ्या एलईडी दिव्यांचे उत्पादन सुरु  करुन सिद्ध करून दाखविले आहे.

LED bulbs supplied by women in City | दुर्गम महागांवमधील अंधाऱ्या झोपडीतील महिला वीजबचतीच्या संदेशासह शहरी भागांत पुरवणार एलईडी बल्ब

दुर्गम महागांवमधील अंधाऱ्या झोपडीतील महिला वीजबचतीच्या संदेशासह शहरी भागांत पुरवणार एलईडी बल्ब

Next

- जयंत धुळप

रायगड - 
 ग्रामीण गावातील महिलांना आर्थिक व सामाजिक अशा अनेक मर्यादा असतात, मात्र या मर्यादांवर  आधूनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन आपण मात करु शकतो हे, सुधागड या दूर्गम डोंगराळ तालुक्यांतील महागाव मधील स्त्नीशक्ती  महिला बचतगटाच्या महिलांनी चक्क विज बचत करणाऱ्या एलईडी दिव्यांचे उत्पादन सुरु  करुन सिद्ध करून दाखविले आहे. ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून हे अनन्यसाधारण परिवर्तन घडून आले असून, अंधाऱ्या झोपडय़ा आता खऱ्या अर्थाने प्रकाशमान झाल्या आहेत.

ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानातून जिल्ह्यातील 56 गावांना नवी दिशा

  मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियांनातील राज्यातील सर्वाधिक 22 ग्रामपंचायतींमधील 56 गावे रायगड जिल्ह्यात असून या सर्व गावांत या अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु  आहे. यामधीलच सुधागड तालुक्यातील 12 वाड्यांनी बनलेली आणि 1800 लोकवस्थीची ही महागाव ग्रामपंचायत आहे. महागाव मधील अनेक समस्यांवर मार्ग काढण्याकरिताच ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात या गावाची निवड करण्यात आली आहे.

11 महिलांचे 22 हात अवघ्या 7 मिनिटांत एक एलईडी बल्ब

महागाव मधील ग्राम समाज परिवर्तक विनोद तिकोणे यांनी महिलांचे संघटन करुन त्यांचा स्त्री शक्ती नावाचा बचत गट तयार केला. या महिलांना पारंपारिक व्यवसाय देण्यापेक्षा आधुनिक व्यवसाय देण्यासाठी त्यांनी एलईडी बल्ब उत्पादन हा व्यवसाय निवडला. एलईडी बल्ब तयार करण्याचे हे कौशल्य महागांव मधील या महिलांना शिकवण्याची जबाबदारी वर्धा येथील शक्ती इलेक्ट्रिकल्स या संस्थेने घेतली आणि गटाच्या अनेक महिला जिद्दीने प्रशिक्षित देखील झाल्या. विज म्हणजे काय, ती कोठे तयार होते, कोठून येते याची कल्पनाही नसलेल्या या महिला आता अत्यंत सफाईदारपणे इलेक्ट्रीक सिर्कटचे सोल्डरिंग, बल्बच्या कॅपचे पंचिंग, सर्कीट मध्ये डायोड-कॅपॅसिटर्स जोडणीचे काम कौशल्यपूर्णतेने करीत आहेत. स्त्रीशक्ती महिला गटाच्या 11 महिलांचे हे 22 हात अवघ्या 7 ते 8 मिनिटांत एक एलईडी बल्ब तयार करतात. तयार झालेला एलईडी बल्ब टेस्टिंग युनिटमध्ये प्रकाशमान होताच, या महिलांचे चेहेरे देखील आगळ्य़ा तेजाने उजळून जातात.

एलईडी बल्ब बरोबरच सोलर पॅनल व कुलरची निर्मिती महिला करणार

एलईडी बल्ब उत्पादनाचे युनिट साकारण्यासाठी सुमारे 65 हजार रु पयांचा खर्च आहे. त्यात एलईडी प्लेट्स, पीसीबी प्लेट,  कॅपॅसिटर, कॅप, बॉडी, मास्क पंचिंग मशिन, सोल्डर मशिन, प्रेसिंग युनिट,  टेस्टिंग आणि कंट्रोल युनिट या सोबत  इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल टूलबॉक्स यांचा समावेश आहे. या युनिट मधुन 30 हजार रु पयांचे बल्ब पहिल्या टप्प्यात तयार केले जातील. त्यासाठी 15 हजार रु पयांचे खेळते भांडवल ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षण, कच्चा माल पुरवठा ते उत्पादन  या अशा टप्प्यासाठी शक्ती इलेक्ट्रीकल वर्धा या संस्थेसोबत ग्रामपंचायतीने करार केला आहे. पहिल्या टप्प्यात केवळ बल्बचे असेम्ब्लिंग असेल तरी दुस-या टप्प्यात  पीसीबी प्लेटसुद्धा या महिलाच तयार करतील. या शिवाय सोलर पॅनल व कुलर निर्मितीचे प्रशिक्षणही या महिलांना दिले जाणार असल्याची माहिती ग्रामीण सामाजिक परिवर्तक  विनोद तिकोणे यांनी दिली.

स्ट्रीटलाईट बल्ब जिल्ह्यातील नगरपालिकांनी खरेदी करणे अपेक्षित

विना वॉरंटी, एक वर्ष वॉरंटी आणि दोन वर्षे वॉरंटी असे तीन प्रकारचे बल्ब तयार करतात. अर्थात या तिनही प्रकारांच्या किमतीत फरक असतो. या किमती बल्बच्या वॅट नुसार आणि प्रकारानुसार बदलतात. साधारण 20 रु पयांपासून ते 5 हजार रु पयांपर्यंत विविध क्षमतेचे आणि प्रकारांचे बल्ब तयार होतात. स्ट्रीट लाईट म्हणून वापरावयाचे दिवेही महागाव मध्ये तयार होत आहेत. जिल्ह्यातील नगरपालीकांनी हे स्ट्रीट लाईट बल्ब खरेदी करुन या महिलांना जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध करुन द्यावी असे आवाहन ग्रामीण सामाजिक परिवर्तक तिकोणे यांनी केले आहे.

रोजगार आणि स्थलांतराच्या समस्येवर मार्ग सापडला

  महागाव मध्ये केवळ पावसाळ्य़ातील भातशेती हेच  एकमेव उदरनिर्वाहाचे साधन आहे. भातशेतीची कामे वगळता उवर्रित काळात येथे काम नसते. परिणामी अनेक आदिवासी बांधव अन्य शहरात वा प्रसंगी अन्य राज्यात कोळसा भटय़ांवर रोजगारासाठी स्थलांतरीत होण्याची येथे परंपराच आहे. परिणामी गावात  सामाजिक प्रश्न निर्माण होत असतात. ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात  महागाव मधील महिलांना रोजगाराची आणि त्याला जोडून येणारी हंगामी स्थलांतराची समस्या भेडसावत होती,ती आता दूर होवू शकणे दृष्टीपथात आले आहे. 

 

थेट मुख्यमंत्नी कार्यालयाकडून आढावा

ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या या 56 गावात एक प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ता नियुक्त करण्यात आला असून या कार्यकर्त्यामार्फत गाव विकास आराखडा तयार करु न गावातील विकास योजनांच्या अंमलबजावणीचे काम होत आहेत. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन घटकांना केंद्रीभूत मानून हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला ग्रामसभेची मान्यता घेण्यात येते. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय जिल्हा अभियान समीतीचे त्यावर नियंत्नण असते. या समीतीचे समन्वयक अधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, थेट मुख्यमंत्नी कार्यालयाकडून दर महिन्याला या ग्राम विकास कामांचा आढावा घेतला जातो.

Web Title: LED bulbs supplied by women in City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.